संख : आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच यांना योग्य ते अधिकार दिले आहेत. सीमा भागातील अनेक नागरिक कर्नाटकात नोकरीसाठी ये-जा करतात. तसेच कर्नाटकातून नोकरीस येणाऱ्या लोकांची नांवे पोलीस ठाण्यास कळवावित. नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी केले.
जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाणे हद्दीतील कोतवबोबलाद, कोणबगी, गुलगुंजनाळ, येथील आपत्ती व्यवस्थापन कमिटीच्या बैठकीत बोलत ते होते.
दत्तात्रय कोळेेेकर म्हणाले, कोविडच्या अनुषंगाने ब्रेक द चेन या उपक्रमाकरिता आपत्ती व्यवस्थापन कमिटीने नियोजनबद्ध चांगले कार्य करावे. सरकारने दिलेले मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे. गावामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना दिल्या.
या बैठकीस आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, रेशन दुकानदार, अंगणवाडीसेविका उपस्थित होते.