शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:55 IST

तासगाव नगरपालिकेची दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व सभा झाली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रशासन आणि कारभारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. कारभाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करून भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनीदेखील, भानगडी बाहेर काढण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देमुख्याधिकारीसाहेब, भानगडी बाहेर काढाच!भानगडबाज कारभारावर शिक्कामोर्तब

दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिकेची दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व सभा झाली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रशासन आणि कारभारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. कारभाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करून भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनीदेखील, भानगडी बाहेर काढण्याचा इशारा दिला.

एकमेकांच्या भानगडीमुळे पालिकेतील भानगडबाज कारभारावर शिक्कामोर्तब झाले. आता मुख्याधिकाऱ्यांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता भानगडी चव्हाट्यावर आणाव्यात, अशी मागणी तासगावकरांकडून होत आहे.तासगाव नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी आणून विकासाची गंगा वाहती ठेवण्याचा प्रयत्न केला. नेमके याच वाहत्या गंगेत सत्ताधाऱ्यांनी हात धुऊन घेण्याचे अनेक कारनामे केले. काही कारभाऱ्यांनी स्वत:च ठेकेदारी सुरु केली. काहींनी ठेकेदारांना पोसण्याचे उद्योग केले. जादा दराच्या निविदा, बेकायदा आणि बोगस कामे, निकृष्ट दर्जाची कामे, अशा एक ना अनेक कामांचा पायंडाच सत्ताधाऱ्यांनी सुरु केला होता.बेकायदा कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, केवळ सत्ताधारी कारभारीच याला जबाबदार होते, अशी परिस्थिती नव्हती. अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्ट कारभार बोकाळला होता. विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अकांडतांडव करूनदेखील भ्रष्ट कारभाराचे सर्व कारनामे दडपून ठेवण्यात आले होते.सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांचा हम करे सो कायदा, याप्रमाणेच कारभार सुरु होता. किंंबहुना अनेक बेकायदा कामे नियमात बसवून करण्याची नामी शक्कल लढवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षात भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही ना सत्ताधाऱ्यांनी खदखद केली, ना प्रशासनाने आक्षेप केला. मिळून सारे जण... असाच सर्व रागरंग होता.मात्र काही महिन्यांपासून पालिकेच्या कारभारात बदल होत होता. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची फ्री हॅन्ड कामाची पध्दत सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणारी होती. मात्र नव्याने आलेले मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या कारकीर्दीत नियमांची सांगड घालून काम करण्यास सुरुवात झाली. इथूनच पालिकेच्या कारभाराला कलाटणी मिळाली.गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरु असलेल्या बेलगाम कारभाराला मुख्याधिकारी शिंंदे यांनी लगाम लावला. त्यामुळे कारभाऱ्यांच्या मनमानीला चाप बसला. मुख्याधिकारी जुमानत नाहीत म्हटल्यावर आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनीच भ्रष्टाचाराविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. प्रशासनातील अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप केला. या आरोपांच्या फैरींनी संतप्त झालेल्या मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांना तुमच्या भानगडी बाहेर काढू असा सज्जड इशाराच भर सभेत देऊन टाकला.मुख्याधिकाऱ्यांच्या वक्तव्याने पालिकेत भानगडी आहेत, यावर शिक्कामोर्तब झालेच. मुळातच पालिकेचा कारभार भानगडबाज असल्याचे अनेकदा चव्हाट्यावर आले होते. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाचे अंडरस्टॅँडिंग असल्याने या कारभाराची चिरफाड झाली नाही.

मात्र मुख्याधिकारी शिंंदे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरच, पालिकेतील स्वच्छतेच्या ठेक्याची बोगस कागदपत्रे बाहेर पडली. त्यापूर्वी अशा बेकायदा कामाचा एकही कागद जनतेसमारे आला नाही. मात्र आता मुख्याधिकारी शिंंदे यांनी चॅलेंज केलेच आहे, तर भानगडी चव्हाट्यावर काढाव्यात, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे कारभारी असोत अथवा प्रशासनातील अधिकारी असोत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. जनतेच्या हितासाठी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या भानगडी बाहेर काढाव्यात, नाही तर अधिकाऱ्यांनी कारभाऱ्यांच्या भानगडी बाहेर काढाव्यात. नेमक्या भानगडी जनतेसमोर आल्याशिवाय भानगडबाज पालिकेतील नेमक्या भानगडी कोणी केल्या, हे चव्हाट्यावर येणार नाही. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळ