शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार बदला-: प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील नावांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:08 IST

गत लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. आता भाजपचा पराभव करायचा असेल तर उमेदवार बदला, असा सूर शुक्रवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निघाला.

ठळक मुद्दे पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत मागणी

सांगली : गत लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. आता भाजपचा पराभव करायचा असेल तर उमेदवार बदला, असा सूर शुक्रवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निघाला. उमेदवारीसाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावांची चर्चाही बैठकीत झाली. तसेच काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मात्र लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचा पुनरूच्चार केला.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस कमिटीत पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, पक्षनिरीक्षक प्रकाश सातपुते, सहनिरीक्षक संजय पाटील यांच्यासह पार्लमेंटरी बोर्डाचे ४५ सदस्य उपस्थित होते. बंद दरवाजाआड झालेल्या या बैठकीत उमेदवारीवरून जोरदार चर्चा झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. यामध्ये सांगलीत भाजपचा पराभव करायचा असेल तर नवा चेहरा देण्याचाही सूर काही सदस्यांनी आळवला. पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीबाबत अनेकांनी समर्थन केले, तर वसंतदादा गटाकडून प्रतीक पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.

प्रतीक पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यास विशाल पाटील यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी भूमिकाही या गटाने घेतली. डॉ. विश्वजित कदम यांनी मात्र, पुन्हा मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करीत, पक्ष देईल त्या उमेदवारासाठी रात्रीचा दिवस करू असे सांगितले. पृथ्वीराज पाटील यांनी जिल्ह्यात फिरून मते अजमावली असून भाजपविरोधी रोष एकदिलाने एकवटल्यास पुन्हा सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला होईल, असे स्पष्ट केले. तसेच प्रतीक पाटील यांनी, उमेदवारीसोबतच मनोमीलन होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सदाशिवराव पाटील, विक्रम सावंत, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, प्रा. सिद्धार्थ जाधव, संजय मेंढे, वहिदा नायकवडी, बिपीन कदम यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.प्रदेशला अहवाल देणार : सातपुतेबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पक्षनिरीक्षक प्रकाश सातपुते, संजय पाटील म्हणाले, राज्यात भाजपविरोधी लाट आहे. त्यामुळे जिल्ह्यात तळागाळापर्यंत जाऊन मोर्चेबांधणी करा. यासाठी एकदिलाने लढायची तयारी ठेवू. त्यांनी सर्वच ४५ सदस्यांच्या भूमिका ऐकून घेतल्या. येत्या २१ जानेवारीला मुंबईत राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांसाठी पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार आहे. त्यानुसार आता मी, मोहनराव कदम तसेच संजय पाटील चर्चा करून इच्छुकांसह उमेदवाराबाबत लवकरच प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. सांगली लोकसभेचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय प्रदेश पार्लमेंटरी बोर्डच घेणार आहे हे जरी खरे असले तरी, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार करुनच उमेदवाराचे नाव निश्चित करणार आहे, असेही प्रकाश सातपुते यांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण