शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चांदोलीला 'अमेझिंग चांदोली' म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर आणणार - खासदार धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 14:51 IST

चांदोली परिसर विकसीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करण्याचे दिले निर्देश

शिराळा : चांदोलीचा परिसर हे आपले सर्वात मोठे वैभव आहे. हे वैभव जगाच्यासमोर येणे ही काळाची गरज आहे. यापुढे चांदोलीला 'अमेझींग चांदोली' म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा मानस आहे. त्याकरिता चांदोलीच्या इतिहासात प्रथमच यू ट्यूब, फेसबुक पेज, रिल्स, जर्सी आदींच्या माध्यमातून चांदोली मधील विविधता आता टप्याटप्याने जगासमोर येईल. असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.वारणावती (ता. शिराळा ) येथे वन सभागृहात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, उपवनसंरक्षक उत्तम सावंत, विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती. चांदोली परिसर विकसीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करावा असे निर्देश देखील खासदार धैर्यशील माने यांनी दिले.खासदार माने म्हणाले, परिसर पर्यटन क्षेत्र व व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात मोठी संधी असलेले हे क्षेत्र आहे. हे क्षेत्र पर्यटकांसमोर येण्यासाठी त्याचा कालबध्द विकास होणे व  पर्यटन क्षेत्र लोकल ते ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चांदोलीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील १० वर्षातील गरजा लक्षात घेवून संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव तयार करावेत असे आदेश त्यांनी यावेळी दिले.यावेळी खासदार  माने यांच्या हस्ते अमेझींग चांदोली या जर्सी, फेसबुक पेज, लोगो व पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले. चांदोलीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी राजीव पाटील यांनी तयार केलेल्या सोशल मीडिया रिल्सचे फेसबुक पेज व युट्युब चॅनेल व ट्रेलर चे लॉचिंगही यावेळी झाले.यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, सुखदेव पाटील, हणमंतराव पाटील, सरपंच वसंत पाटील, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, राजीव पाटील, सुमित साळुंखे, सागर जाधव, अर्जुन बिराजदार सुयोग पाटील, विजयसिंह देसाई, निलेश आवटे, आकाश पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वन विभाग व वन्यजीव विभाग, बांधकाम विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग यांनी चांदोली पर्यटन विकासाबाबतचे थोडक्यात सादरीकरण केले.

टॅग्स :Sangliसांगली