शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

काँग्रेससमोर ‘नांदेड’च्या पुनरावृत्तीचे आव्हान--महापालिका :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:10 IST

सांगली : वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकी काँग्रेसचे एकेक बुरूज ढासळले.

ठळक मुद्देखमक्या नेतृत्वाचा अभाव; गटबाजीने पक्षाला पोखरले; भाजप, राष्ट्रवादीची तयारी या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे राहणार, हा प्रश्न आहे.

शीतल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकी काँग्रेसचे एकेक बुरूज ढासळले. जिल्ह्यात एकमेव महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप, राष्ट्रवादीने कंबर कसली असताना, काँग्रेसकडे मात्र खमक्या नेतृत्वाचा अभाव दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला भुईसपाट केले. त्याचीच पुनरावृत्ती सांगलीत करण्याचे आव्हान येथील विद्यमान काँग्रेस नेतृत्वासमोर असेल.

सांगली जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला, हे समीकरण आता इतिहासजमा झाले आहे. खासदार, आमदारकीपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. पण काळाच्या ओघात जिल्ह्यावरील काँग्रेसचे वर्चस्व कमी झाले. सध्या केवळ पतंगराव कदम यांच्यारूपाने केवळ एक आमदार काँग्रेसकडे आहे. लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसला जिल्ह्यात घरघर लागली. वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांना या घराण्याच्याच तालमीत तयार झालेल्या संजयकाका पाटील यांनी लोकसभेला पराभवाचा दणका दिला. त्यानंतर सुरू झालेली पडझड अद्यापही थांबलेली नाही.

विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच जिल्ह्यात देदीप्यमान यश मिळविले. त्यानंतर झालेल्या नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा राहिला. जिल्हा बँक, बाजार समिती अशा सहकारी संस्थांतही भाजप सत्तेचा भागीदार बनला.सध्या काँग्रेसकडे सांगण्यासारखे केवळ एकच सत्तास्थान शिल्लक आहे, ते म्हणजे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका. चार वर्षापूर्वी सांगलीकरांनी मदन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता सोपविली. पण आता या सत्तेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. काँग्रेसमध्ये मोजता न येण्याइतपत गट-तट झाले आहेत. विशेषत: मदन पाटील यांच्या निधनानंतर महापालिका क्षेत्रातील काँग्रेस पोरकी झाली असून खमक्या नेतृत्वाअभावी पक्षाचे अवसानच गळाले आहे. मदन पाटील यांना विधानसभेला पराभव स्वीकारावा लागला होता, तरी त्यांचा दबदबा कायम होता. विशेषत: मिरज तालुक्यात त्यांच्या शब्दाला मान होता. महापालिकेच्या राजकारणात तर त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता. पण त्यांच्या निधनानंतर महापालिकेतील सत्ताधाºयांचा ताळतंत्रच सुटला आहे. प्रत्येकजण स्वत: नेता बनून समोर येऊ लागला आहे. त्यातून गटबाजी, संघर्ष उफाळत आहे. भ्रष्टाचार, बेकायदेशीर कारभाराच्या आरोपाचा कलंक दिवसेंदिवस गडद होत चालला आहे. पुढीलवर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे राहणार, हा प्रश्न आहे.

मदन पाटील यांच्या पश्चात जयश्रीताई पाटील यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न चालविला आहे, पण त्यांनाही मर्यादा पडत आहेत. वसंतदादांचे नातू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी महापालिकेच्या राजकारणापासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे. दुसरे नातू विशाल पाटील यांनी महापालिकेत स्वत:चा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून मदन पाटील गटाशीच त्यांच्या गटाचा दररोज संघर्ष सुरू आहे. त्यातच विशाल पाटील यांनी वसंतदादा साखर कारखाना खासगी कंपनीकडे चालवण्यास देऊन विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे. माजी मंत्री आ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना त्यांच्या कामाच्या व्यापातून पालिकेत अपेक्षित लक्ष देता येत नाही. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काही प्रमाणात संघटन सुरू केले आहे, मात्र मदन पाटील आणि विशाल पाटील गट त्यांच्याशी जुळवून घेताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेतील काँग्रेस निराधार झाल्याचे दिसून येते.

आता जिल्ह्यातील काँग्रेसच्या या एकमेव सत्तास्थानालाही धक्का देण्याची तयारी भाजपने चालविली आहे. आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, मकरंद देशपांडे अशी मोठी फौज भाजपकडे आहे. त्याशिवाय पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील या बड्या नेत्यांची मदतही होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी नवरात्र व गणेशोत्सवात विविध मंडळांना भेटी दिल्या. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रवादीची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सभासद नोंदणीतून घरा-घरापर्यंत जाण्याचा प्रयोग राष्ट्रवादीकडून सुरू आहे. या घडामोडी पाहता, निवडणूकपूर्व तयारीत काँग्रेस कोठेच दिसत नाही.

नांदेड महापालिकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी एकहाती सत्ता आणली. या विजयाने सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. नांदेडप्रमाणे सांगलीतही पुनरावृत्ती करू, असा संदेश सोशल मीडियावरून दिला जात आहे. पण ते शक्य आहे का, याचे चिंतन करण्याची वेळ सांगलीतील काँग्रेसवर आली आहे.मिरजकर ठरणार : किंगमेकरमहापालिका निवडणुकीत वारे कोणत्याही दिशेने वाहत असले तरी, आजपर्यंत मिरजकरच किंगमेकर ठरले आहेत. मिरजेतून जादा जागा जिंकणारा पक्षच पालिकेत सत्तेवर विराजमान झाला आहे. किशोर जामदार, सुरेश आवटी, इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान अशी दिग्गज मंडळी सत्तेचा सारीपाट मांडतात. गतवेळी बागवान वगळता सर्वजण काँग्रेसच्या पाठीशी होते, तर २००८ च्या निवडणुकीत जामदार वगळता सर्व मंडळी विकास महाआघाडीत होती. सध्या आवटी व नायकवडी काँग्रेसवर नाराज आहे.