शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ब्रम्हनाळ, भिलवडी परिसराला केंद्रीय पथकाची भेट, नुकसानीची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 15:54 IST

सांगली शहर व जिल्ह्यातील 104 गावांना महापूराचा जबर फटका बसला आहे. व्यापार, शेती, घरे, पशुधन यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दोन दिवस जिल्ह्यात दाखल होते. आज या पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी, भुवनेश्वरवाडी या परिसराला भेट देवून पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.

ठळक मुद्देब्रम्हनाळ, भिलवडी परिसराला केंद्रीय पथकाची भेटनुकसानीची केली पाहणी

सांगली  : सांगली शहर व जिल्ह्यातील 104 गावांना महापूराचा जबर फटका बसला आहे. व्यापार, शेती, घरे, पशुधन यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दोन दिवस जिल्ह्यात दाखल होते. आज या पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी, भुवनेश्वरवाडी या परिसराला भेट देवून पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.डॉ. व्ही. थिरुपुगाज, सहसचिव (पी ॲण्ड पी) नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने या गावांची पाहणी केली. त्यांच्या समवेत संजय जयस्वाल अधिक्षक अभियंता, नवी मुंबई हे होते. या पथकासमवेत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील पथक ब्रम्हनाळ येथे दाखल झाले. त्यांनी तेथील दलित वस्ती, कुटुंब कल्याण केंद्र, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी या ठिकाणी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ दुर्घटना कशी घडली याबाबत जाणून घेतले. तसेच तेथील शेतकऱ्यांचे शेतीचे किती नुकसान झाले आहे, पशुधनाचे किती नुकसान झाले आहे याचीही माहिती घेतली.

यावेळी गावकऱ्यांनी भिलवडी, ब्रम्हनाळ, खटाव या भागात प्रामुख्याने ऊसाचे पिक असून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 240 हून अधिक पशुधन वाहून गेले आहे असे सांगून मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा मोठा पूल व्हावा, अशी विनंती केली. तसेच गावचे पुनर्वसन व्हावे, अशीही मागणी केली.

यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने पूरपश्चात उपाययोजना, मदतकार्य अत्यंत उत्तमरित्या राबविल्याचे नमूद केले. या पथकाने भिलवडी येथे पडझड झालेली घरे, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, जनावरांचा गोठा आदिंची पाहणी केली. तर भुवनेश्वरवाडी येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.हरिपूर येथे केंद्रीय पथकाची भेटतसेच हरिपूर येथे केंद्रीय पथकातील आर. पी. सिंग संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली या सदस्यांनी भेट दिली. या ठिकाणी पडझड झालेली घरे, हळदीचे पेव यांची पाहणी करून केळी, भुईमुग, ऊस आदि नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच मयत झालेल्या जनावरांच्या गोठ्यास भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSangliसांगली