शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोयना, अलमट्टीच्या पाणी व्यवस्थापनात केंद्राने लक्ष द्यावे; खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:32 IST

केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी महापुराचा प्रश्न उपस्थित

सांगली : ‘महाराष्ट्रात कृष्णा नदीला महापूर येईल, अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होत आहे. महापुराचे हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अलमट्टी आणि कोयना धरणातील पाणीसाठा व्यवस्थापन व्हावे, याबाबत कडक सूचना द्याव्यात,’ अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी बुधवारी लोकसभेत केली.केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी विशाल पाटील यांनी महापुराच्या प्रश्नावर लक्ष वेधले. विशाल पाटील म्हणाले, ‘माझा सांगली मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्र महापुराने प्रभावित होत आला आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात २००५, २०१९ आणि २०२१ ला महाप्रलंयकारी महापूर आला होता. आज पुन्हा एकदा महापुराची गंभीर समस्या निर्माण होताना दिसत आहे. या परिस्थितीकडे केंद्रीय जल आयोगाच्या धोरणानुसार धरणातील पाणीसाठ्याबाबतच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे.मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. त्यात चार मुद्द्यांचा प्राधान्याने विचार करायला हवा. ज्यात कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांतील पाणी आणि कोयना, अलमट्टी धरणातील पाणीसाठा याचे ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’ करणे, पूर व्यवस्थापन आराखडा राबवणे, पूरपट्ट्यात आवश्यक पायाभूत सुविधा देणे आणि महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील पाटबंधारे विभागाचा समन्वय हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. कारण, या महापुरात मनुष्यबळ, पशुधन, शेतीसह मालमत्तेची मोठी हानी होते. हे टाळण्यासाठी केंद्राने लक्ष द्यायला हवे.’

आसामप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष द्याकेंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आसाममधील पूरबाधित क्षेत्राचा उल्लेख केला आहे. त्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित क्षेत्राचा विचार करावा. येथे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका विशाल पाटील यांनी केंद्रीय अधिवेशनातील चर्चेवेळी मांडली.

टॅग्स :Sangliसांगलीvishal patilविशाल पाटीलfloodपूरlok sabhaलोकसभा