शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: स्मशानभूमी गेली पाण्याखाली, शिगावला रस्त्यावरच करावे लागले दहनसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:56 IST

पर्यायी व्यवस्था करण्याची ग्रामस्थांची मागणी

शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथील वारणा नदीच्या पात्रालगत असलेली गावाची पारंपरिक स्मशानभूमी दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाते. यामुळे गावातील नागरिकांना मृत व्यक्तींचा अंत्यविधी मुख्य रस्त्यावरच करावा लागतो. गुरुवारी गावातील मृतावर असेच दहनसंस्कार ग्रामस्थांना रस्त्यावरच उरकावे लागले.जोरदार पाऊस झाल्यास नदीपात्रात अचानक पाणी वाढते आणि संपूर्ण स्मशानभूमी जलमय होते. अपुरी व्यवस्था आणि स्थानिक अडचणींचा सामना करत ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या समांतर उंचीवर नवीन पर्यायी स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरत आहे. अशी सोय झाली तर आपत्तीच्या काळातही नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी जागेची पाहणी करून आवश्यक निधी मंजूर करून काम हाती घ्यावे, असे आवाहन ग्रामस्थांमधून करण्यात आले आहे.