शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोटखिंडी येथील मशिदीत शिवजयंती साजरी, माळवाडीतील मुख्य चौकाला शिवाजी चौक नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:16 IST

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुझांर चौकातील मशिदीत न्यू गणेश तरुण मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयाचे पूजन विनायक पाटील, विजय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुझांर चौकातील मशिदीत न्यू गणेश तरुण मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयाचे पूजन विनायक पाटील, विजय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विजय लोंढे, अध्यक्ष गणेश फाळके, रियाज मुलाणी, जमीर जमादार, प्रदीप पाटील, हणमंत जाधव, रोहन थोरात, राहुल कोकाटे, रोहन थोरात, बाबूराव पठाण उपस्थित होते.

माळवाडी परिसरातील मुख्य चौकाला शिवाजी चौक नामकरण फलकाचे उद्घाटन सरपंच विजय लोंढे, उपसरपंच नंदकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर महाराजांच्या अर्धपुतळ्याचे पूजन जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी जगन्नाथ पाटील, अक्षय पाटील, नितीन पाटील, रामचंद्र पाटील, प्रकाश एटम, प्रकाश पाटील, सागर डवंग, विनायक पाटील, संदीप पाटील, अशोक पाटील, अभिजित घारे, रामचंद्र घारे, विलास खराडे, दिलीप पाटील, के. डी. पाटील, विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी, व तरुण शिवभक्त उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायतीमध्ये शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच विजय लोंढे, उपसरपंच नंदकुमार पाटील, प्रदीपदादा पाटील, पोपट डवंग, राहुल भोईटे, महेश शेजावळे, उदय थोरात, रमेश पाटील, दिलीप पाटील, अभिजित घारे, जगदीश पाटील, संभाजी पाटील उपस्थित होते. शिंगटे मळ्यात हिंदवी तरुण मंडळ, शिवतेज तरुण मंडळांकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. तर पन्हाळगड येथून अनेक तरुणांनी ज्योत आणली होती. यावेळी संपूर्ण गावातून शिवगर्जना व भगवे झेंडेनी गांव शिवमय झाला होता. दरम्यान, शिवसेना शाखाप्रमुख रामंचद्र घारे यांनी ग्रामसचिवालयासमोरील आठवडी बाजारास ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नामकरण करण्याची सरपंच विजय लोंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.

टॅग्स :SangliसांगलीShivjayantiशिवजयंती