शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

सांगली, मिरजेत नाताळ उत्साहात साजरा : चर्चमध्ये विशेष प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:29 IST

मंगळवारी सांगली व मिरज शहरात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या चर्चना आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचे

ठळक मुद्देधार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमावेळी ख्रिश्चन बांधवांची गर्दी

सांगली/मिरज : मंगळवारी सांगली व मिरज शहरात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या चर्चना आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिसमसनिमित्त विशेष ट्री विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते.

येशू ख्रिस्तांच्या करुणा व क्षमाशीलतेच्या संदेशाचे स्मरण करून देणारा सण म्हणून नाताळकडे पाहिले जाते. नाताळनिमित्त मंगळवारी शहरातील सांगली-मिरज रोडवरील सांगली चर्चमध्ये, कापड पेठ परिसरातील चर्चसह विविध उपनगरांमध्ये असलेल्या चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनीही ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. चर्च परिसरात देखावाही उभारण्यात आला होता.

मिरज शहरातही नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा, ख्रिस्तजन्म संदेशासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शहरातील विविध चर्चच्या इमारती रोषणाईने झगमगत होत्या. शहर व परिसरात नाताळ मोठ्या प्रमाणात साजरा झाला.

मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिस्तजन्म उपासना व नाताळनिमित्त संजय गायकवाड यांनी ख्रिस्त जन्माचा संदेश दिला. महापौर संगीता खोत, माजी आमदार शरद पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, सदाशिव वाघमारे, सचिन जाधव, नगरसेवक संजय मेंढे, अय्याज नायकवडी, चंद्रकांत आंबी, इलियास शेख, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समीत कदम यांच्यासह राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

नाताळनिमित्त मिरज ख्रिश्चन चर्च, रोझरी चर्च, अल्फोन्सा चर्च, सेंटपिटर तेलगू चर्च यांसह शहरातील विविध चर्चच्या इमारती विद्युत रोषणाईने सजल्या होत्या. ख्रिस्तजन्म उपासनेसह नाताळचा विशेष संदेश व ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत उपासना सभा, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. इस्त्राईलनगर, कमान वेस, वानलेसवाडी, बेथेलहेमनगर परिसरात विद्युत रोषणाईसह मोठे आकाशदिवे झगमगत होते.

नाताळनिमित्ताने जागोजागी ख्रिसमस ट्री सजविण्यात आले होते. विविध संस्थांतर्फे धार्मिक गीतगायन स्पर्धा, ख्रिस्त जन्माची नाटिका, रांगोळी स्पर्धा यांसह निरनिराळे कार्यक्रम पार पडले. दि. ३१ रोजी रात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फेरी व कँडल लाईट सर्व्हिस कार्यक्रम होणार आहे. दि. १ जानेवारी रोजी सकाळी प्रार्थना व नूतन वर्षाची उपासना होणार आहे.चर्चवर विद्युत रोषणाई, घरांनाही सजावटमिरज शहरातील विविध चर्चच्या इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात विविध उपक्रम सुरू आहेत. केवळ चर्चच नव्हे, तर ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरांवरही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शहरात सर्वत्र नाताळचा उत्साह दिसून येत आहे.