शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पूरग्रस्त भागावर सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 22:48 IST

आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागात अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी चिंतामणी कांबळे व पथकाकडून प्रबोधन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे नागरिकांशी संपर्क करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नागरिकांचा जीव कसा वाचवावा, याबाबत जनजागृती सुरू आहे.

ठळक मुद्देसांगली महापालिकेकडून नियोजन : दोन नवीन यांत्रिक बोटीची खरेदी१ हजार लाईफ जॅकेट घेणार आपत्ती यंत्रणा सज्ज

सांगली : गतवर्षी सांगली, मिरज शहराला महापूराचा मोठा दणका बसला होता. त्यामुळे यंदा महापालिकेने संभाव्य महापूराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासून यंत्रणा सज्ज केली आहे. शहरातील पूरग्रस्त भागात सीसीटीव्ही बसविले जात असून नव्याने दोन यांत्रिकी बोटी, हजार लाईफ जॅकेटसह विविध साहित्यही महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दाखल होत आहे. संभाव्य महापूरच्या पार्श्वभूमीवर आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. गतवर्षी महापूराने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे धिंडवडे काढले होते.  त्यामुळे महापालिकेने आतापासून यंत्रणा सज्जतेवर भर दिला आहे. गतवर्षी नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी तरुण मंडळे, बोट क्लबनी मदतीचा हात दिला होता. या मंडळ, बोट क्लबशी महापालिकेने संपर्क साधला आहे.

सध्या महापालिकेकडे ७ यांत्रिकी बोटी आहे. त्यात आता नव्याने दोन यांत्रिकी बोटीची भर पडणार आहे. त्याशिवाय ५० लाईट जॅकेट उपलब्ध आहेत. महापालिकेने आणखी १ हजार लाईफ जॅकेटची खरेदी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापनातर्गंत विविध साहित्यांचीही खरेदी केली जात आहे. महापालिकेच्यावतीने गावभाग, कृष्णा नदी काठ, दत्तनगर, शामरावनगर, कोल्हापूर रोड या पूरपट्ट्यात १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरूवात केली आहे. हे कॅमेरे महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला जोडले जाणार आहेत. त्यामुळे पुराचे पाण्यावर लक्ष ठेवता येणार आहे. आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागात अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी चिंतामणी कांबळे व पथकाकडून प्रबोधन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे नागरिकांशी संपर्क करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नागरिकांचा जीव कसा वाचवावा, याबाबत जनजागृती सुरू आहे. 

सात ठिकाणी बोट हाऊस 

गतवर्षी पुरावेळी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बोटी वेळेवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदा आयुक्त कापडणीस यांनी पुरग्रस्त भागात सात ठिकाणी बोट हाऊस उभे करण्याच्या सूचना अग्निशमन विभागाला दिले आहेत. या सात ठिकाणी प्रत्येक एक बोट व प्रशिक्षित कर्मचारी असेल. त्यामुळे पुराचे पाणी वाढल्यास संबंधित परिसरात तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचता येणार आहे. तसे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीSangliसांगली