शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आटुगडेवाडीनजीक अपघातात मुंबईची महिला ठार, चारजण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:09 IST

जोरदार धडक बसल्याने कारमधील चालक इजाज मक्सळी, अजय कीर, सुवर्णा कीर, विजया नाईक हे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कºहाडच्या कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

कोकरुड : आटुगडेवाडी (ता. शिराळा) आणि लोहारवाडी (ता. कºहाड) दरम्यान कार व एसटी बसमध्ये झालेल्या धडकेत मुंबईची महिला ठार झाली, तर चारजण जखमी झाले. जखमींना कºहाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. उंडाळे (ता. कºहाड) पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

विजया विनायक नाईक (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे, तर अजय दत्तात्रय कीर (४३), त्यांची पत्नी अंजना अजय कीर (४२), आई सुवर्णा दत्तात्रय कीर (८९), इजाज अब्दुल अजीज मक्सळी (२९, सर्व रा. सिद्धिविनायक, प्रभादेवी, मुंबई) हे जखमी झाले आहेत.

अजय कीर हे आपले कुटुंबीय व त्यांच्या नात्यातील विजया नाईक यांच्यासह मुंबईहून लांजा (रत्नागिरी) येथे नातेवाईकांकडे कारमधून (क्र. एमएच ४७, एन. ७८३०) निघाले होते. सकाळी आठच्या सुमारास क-हाड-रत्नागिरी मार्गावर आटुगडेवाडी आणि लोहारवाडीदरम्यान त्यांच्या कारला शेडगेवाडी येथून क-हाडकडे जाणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच १४, बी. टी. ४८५९) धडक दिली. यात कारमधील चालक इजाज मक्सळी, अजय कीर, सुवर्णा कीर, विजया नाईक हे चौघे गंभीर जखमी झाले. अंजना कीर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. यावेळी काहींनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून घटनास्थळी बोलाविले. सर्व जखमींना तत्काळ कºहाड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असताना दुपारनंतर विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.बसमधील १७ जण जखमीदरम्यान, या अपघातात बसमधील सतराजण किरकोळ जखमी झाले आहेत. यात ११ शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांना स्थानिक रुग्णालायात उपचार करून घरी सोडण्यात आले. क-हाड-रत्नागिरी मार्गावर आटुगडेवाडी ते लोहारवाडीदरम्यान एसटी बस धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.

 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात