शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

डिंबे जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन, शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 14:22 IST

सांगली  : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सांगलीच्या वार्षिक योजना 2019 20 अंतर्गत नाविन्यपूर्ण बाबींमधुन ...

ठळक मुद्देडिंबे जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनमिरज व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

सांगली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सांगलीच्या वार्षिक योजना 2019 20 अंतर्गत नाविन्यपूर्ण बाबींमधुन शेततलावातील मत्स्यपालन चालना देण्याची योजना अंतर्गत निवडण्यात आलेल्या मिरज व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा दिनांक 5 मार्च ते 7 मार्च 2020 दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये मत्स्यबीज उत्पादन केंद्र धोम जि. सातारा , मॅप्रो फळप्रक्रिया केंद्र वाई , कृषी विज्ञान केंद्र बारामती तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यांमध्ये असलेल्या डिंबे धरणाच्या जलाशयामध्ये तयार केलेल्या पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन प्रकल्पास भेट दिली.

तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगली मार्फत राबवण्यात येत असलेल्या शेततळ्यात मत्स्य पालन चालना देणे या प्रकल्पात शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शेततळ्यातील मत्स्यपालन शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी 20 शेतकऱ्यांच्या 10 गटाची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण शेतीशाळा शेतकरी सहली आयोजित करून शास्त्रीय माहितेदेण्यात येत आहे.

शेतीपूरक असणाऱ्या मत्स्यपालन या बाबीवर यामध्ये भर देण्यात येत असून शेततळे फक्त संरक्षित पाणीसाठा म्हणून न वापरता त्यामध्ये मासेपालन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जिल्हाधिकारी सांगली डॉ अभिजित चौधरी यांच्या संकल्पनेतून सदरचा प्रकल्प आत्मा सांगली मार्फत राबवण्यात येत आहे.

सदरचा प्रकल्प यशस्वीतेकडे वाटचाल करत असून प्रकल्पातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन देशातील पहिली मत्स्य उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन केली आहे प्रत्येक टप्प्यावर शेतकर्यांना शेतीशाळे मार्फत मार्गदर्शन करण्यात येत असून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी शेतकरी कृषी विभाग व आत्माचे अधिकारी काम करत आहेत. या अभ्यास दौऱ्यात धोम धरण तालुका वाई जिल्हा सातारा येथील मत्स्यउत्पादक केंद्रास तसेच कृषी विज्ञान केंद्र बारामती येशील मत्स्यप्रकल्पास तसेच (केज कल्चर) बंदीस्त पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन या प्रकल्पास भेटी देण्यात आल्या. यामध्ये शंभर शेतकरी सहभागी झाले होते.

सहलीचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अमर पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी हनुमंत इंगवले, तालुका कृषी अधिकारी मिरज प्रदीप कदम,  तासगाव तालुका कृषी अधिकारी  रमेश मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

आत्माचे जिल्हा समन्वयक मुकुंद जाधवर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विवेककुमार पाटील, आयसीआयसीआय फौंडेशनचे गणेश माळी, बेडगचे डॉ. रवींद्र शेळके, राजाराम खरात, तानाजी सोलनकर, राम खाडे, सावर्डेचे शेतकरी गटाचे प्रमुख प्रमोद निकम, सभासद शेतकरी मनोज माने ,विनोद पाटील ,आदी शेतकरी सहभागी होते. 

टॅग्स :fishermanमच्छीमारSangliसांगली