शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबिंदू असलेल्या स्वराच्या आयुष्यात पुन्हा फुलली फुलपाखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:30 IST

Sangli, hospital, Medical सांगलीत लायन्स रुग्णालयातील डॉक्टरांनी जोखमीची शस्त्रक्रिया करुन हे मळभ दूर केले, त्यामुळे स्वराच्या आयुष्यात पुन्हा रंगीबेरंगी फुलपाखरे बागडू लागली. ​​​​​​​

ठळक मुद्देजन्मत:च दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू स्वराच्या आयुष्यात पुन्हा फुलली फुलपाखरे

सांगली : कोल्हापुरातल्या भारमल कुटुंबात दोन महिन्यांपूर्वी इवल्या-इवल्या पावलांनी स्वराचा प्रवेश झाला. तिच्या आगमनाने भारमल दांपत्य हर्षोल्हासात न्हाले, पण हा उल्हास अल्पजीवी ठरला. पंधरा दिवसांतच स्वराच्या डोळ्यांसमोर अंध:काराचे ढग दाटू लागले. सांगलीत लायन्स रुग्णालयातील डॉक्टरांनी जोखमीची शस्त्रक्रिया करुन हे मळभ दूर केले, त्यामुळे स्वराच्या आयुष्यात पुन्हा रंगीबेरंगी फुलपाखरे बागडू लागली.कोल्हापुरातील किराणा व्यावसायिक भारमल कुटुंबाची ही कहाणी. इवल्याशा स्वराची बुब्बुळे एका जागी स्थिर राहत नसल्याचे आईच्या ध्यानी आले. रुग्णालयात तपासणीअंती स्वराच्या दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू निष्पन्न झाला. यामुळे भारमल दांपत्य हादरले. कोल्हापुरातच काही ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न केले, पण खर्च आवाक्याबाहेरचा होता.सांगलीत घनश्यामनगरमधील लायन्स क्लबच्या श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन नेत्र रुग्णालयाचा संदर्भ त्यांना मिळाला. डॉ. स्वप्नाली बंडगर, चिदानंद हलपन्नावर, डॉ. बी. एन. पाटील व सहकार्यांनी यशस्वी शस्त्रक्रियेची हमी दिली. नुकतीच ती झालीदेखील. पहिल्यांदा एका डोळ्याची व पंधरवड्यानंतर दुसर्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली. दोहोतील मोतीबंदू काढून टाकले.डॉ. बंडगर, हलपन्नावर यांनी सांगितले की, इतक्या अल्प वयातील अर्भकावर रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया झाली. यापूर्वीची अर्भके आठ ते दहा महिन्यांची होती. स्वराच्या डोळ्यांत रंग भरण्यात आम्ही यशस्वी झालो.बुब्बुळांची चंचलता, मोतीबिंदूची निश्चितताअर्भकांचे डोळे प्रकाश किंवा हालचालींना पटकन प्रतिसाद देतात, पण स्वराची नजर तशी नसल्याचे आईच्या लक्षात आले. आता शस्त्रक्रियेनंतर स्वराचे डोळे प्रकाश किंवा हालचालींना त्वरीत प्रतिसाद देऊ लागले आहेत.जनुकीय दोषाची शक्यताप्रशासकीय अधिकारी राधिका सूर्यवंशी यांनी सांगितले की, दहा टक्के बाळांमध्ये जन्मत: मोतीबिंदुची शक्यता असते. जनुकीय दोष किंवा वंशपरंपरेने विकार होतो. स्वराच्या आईलादेखील हा विकार आहे, पण लहानपणी तिच्या डोळ्यांतील मोतीबिंदुवर योग्य उपचार मिळाले नसावेत. तिच्या माध्यमातूनच स्वरालाही मोतीबिंदू झाल्याची शक्यता आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयSangliसांगलीhospitalहॉस्पिटल