शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना: सांगली जिल्ह्यातील व्यावसायिकांनी थकविले १०८ कोटींचे कर्ज

By अशोक डोंबाळे | Updated: July 6, 2024 16:13 IST

वसुलीसाठी व्यावसायिकांना नोटिसा

सांगली : प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेत गत पाच वर्षांमंध्ये १३ हजार ३०५ व्यावसायिकांनी १०८ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज थकीत ठेवले आहे. या योजनेद्वारे उद्योजकांना पुढे जाण्याची नामी संधी आहे. यात व्यावसायिकांना उद्योग उभारण्यासाठी ५० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची तरतूद केली आहे. यामुळे अनेकांना उद्योग वाढविण्यासाठी मदत झाली आहे. मात्र, ही मदत मिळविताना काही व्यावसायिकांनी त्याचा गैरफायदा घेतला.तीन ते पाच वर्षांत कर्जाची परतफेड करण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांचे कर्ज परतच केले नाही. जिल्ह्यात पाच वर्षांत १३ हजार ३०५ व्यावसायिकांनी १९८ कोटी रुपये थकीत ठेवले आहे. आता या व्यावसायिकांना बँकांनी वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तरीही उद्योजक कर्ज भरण्यास तयार नाहीत. यात शिशू, किशोर आणि तरुण या तीन गटातील योजनांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.‘मुद्रा’चे तीन प्रकारचे कर्जशिशू कर्ज : मुद्रा योजनेत छोट्या व्यवसायाला मोठे करण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची तरतूद करण्यात येते. या योजनेत बँकांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.किशोर कर्ज : व्यवसायाला उभारी देताना ५१ हजारांपासून पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी व्यावसायिकांना त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्रत्यक्ष व्यवसायाचे ठिकाणही दाखवावे लागते. यानंतर कर्ज मंजूर करण्यात येते.तरुण कर्ज : मुद्रा लोन योजनेतील सर्वाधिक कर्ज उपलब्ध करून देणारी तरुण योजना आहे. यात पाच लाखांपेक्षा जास्त आणि दहा लाख रुपयांच्या मर्यादेत कर्ज दिले जाते.

बँकांनी घेतले नाही कुठलेही गहाणखतजिल्ह्यातील बँकांनी कर्ज मागणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून दिले. यासाठी कुठलेही गहाणखत घेतले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १३ हजार ३०५ कर्जदारांकडे १०८ कोटी ५० लाख कर्ज थकले आहे. त्यांना आता वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. गहाणखत नसल्यामुळे वसुलीला अडचणी येत आहेत.

व्यावसायिकांना सरकारकडून मदतप्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बँकांनी मुद्रा लोन वितरित केले. यात अनेकांची परतफेड होत आहे. मात्र परतफेड न करणाऱ्यांना बँकांनी नोटिसा बजावल्या आहेत. व्यावसायिकांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे व्यावसायिक कर्जाची परतफेड निश्चित करतील, असा विश्वास बँकांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसायbankबँक