शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

Sangli: सेल्फीच्या नादात नणंद-भावजयीने गमावला जीव, हिंगणगादे येथे तलावात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:18 IST

स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी या दोघींना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विटा : तलावाच्या पाण्यात पाय धुतल्यानंतर सेल्फी काढत असताना पाय घसरून खोल पाण्यात बुडाल्याने नणंद-भावजय असलेल्या तरुणींचा मृत्यू झाला. निशा दिगंबर आढगळे (वय २०) व मयुरी हणमंत आढगळे (वय १७), दोघीही मूळ गाव किर्लोस्करवाडी (ता.पलूस), सध्या रा. घानवड, ता. खानापूर) अशी मृत नणंद-भावजयीचे नावे आहेत. ही घटना रविवारी (दि.१) हिंगणगादे हद्दीतील तलावात घडली.विटा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार किर्लोस्करवाडी येथील आढगळे कुटुंब घानवड येथील एका पोल्ट्रीवर काम करीत आहे. निशा व मयुरी या नणंद-भावजय आहेत. मयुरीची नणंद निशा ही इचलकरंजी येथे राहते. ती रविवारी सकाळी घानवड येथे आली होती. दुपारी या दोघींही प्रातर्विधीसाठी हिंगणगादे हद्दीतील तलावाकडे गेल्या . त्यानंतर त्या दोघी पाय धुण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरल्या. तेथे मोबाईलवर सेल्फी काढत असताना या दोघी पाय घसरून तलावातील खोल पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे असलेले स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी या दोघींना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून पोलिस उपनिरीक्षक पूजा महाजन पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणे