शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पंचायत समितीत लाचखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:40 IST

तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची लाचखोरी चर्चेत आली आहे. तळागाळात काम करणाऱ्या महिलांना मिळालेल्या मानधनाची मागणी करून, उद्योगधंद्यासाठी महिला बचत गटांनी काढलेल्या कर्जातील पैसे उसने घेऊन, मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करून, मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देतासगाव पंचायत समितीत लाचखोरी अधिकाराचा गैरवापर करून, मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी

तासगाव : तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची लाचखोरी चर्चेत आली आहे. तळागाळात काम करणाऱ्या महिलांना मिळालेल्या मानधनाची मागणी करून, उद्योगधंद्यासाठी महिला बचत गटांनी काढलेल्या कर्जातील पैसे उसने घेऊन, मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करून, मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून, त्यांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी मोठी यंत्रणा राबवली जाते. तासगाव पंचायत समितीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहेत.

तालुक्यात दोन हजारपेक्षा जास्त बचत गटांचे जाळे आहे. महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक, जिल्हा परिषद गटनिहाय प्रत्येकी एक प्रभाग समन्वयक, गावपातळीवर प्रत्येकी दहा बचत गटांसाठी एक समूह संसाधन व्यक्ती अशा पध्दतीने तळागाळापर्यंत बचत गटांची चळवळ सक्षम करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे.मात्र तासगावात यंत्रणेला अंधाधुंद कारभाराची कीड लागली आहे. गावात मानधन तत्त्वावर समूह संसाधन व्यक्ती म्हणून अठराशे ते तीन हजार अशा तुटपुंज्या मानधनावर सामान्य महिला काम करत आहेत. मात्र त्यांना मनमानी पध्दतीने वागणूक देऊन, त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मानधनावरच डोळा ठेवून काम करणारे काही अधिकारी असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.तालुक्यातील काही महिला वर्षभरापूर्वी समूह संसाधन व्यक्ती म्हणून नव्याने काम करू लागल्या होत्या. या महिलांना पहिल्यांदा सात महिन्यांचे १२ हजार ६०० रुपयांचे मानधन मिळाले. हे मानधन मिळाल्यापासून पंचायत समितीतील प्रभाग समन्वयकांनी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी संबंधित महिलांनी पैसे खर्च झाल्याचे सांगून टाळाटाळ केली.

पुन्हा काही दिवसांनंतर १२ डिसेंबरला ९ हजार ६०० रुपयांचे मानधन जमा झाले.  त्यावेळी पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांनी या महिलांमागे प्रत्येकी दहा हजार रुपयांसाठी तगादा लावला. तुमचे मानधन जमा झाले आहे, भेटायला या, असे सांगून भेटायला बोलावले. भेट घेतल्यानंतर तुमचे काम दिसत नाही. तरीही तुम्हाला मानधन मिळाले आहे. तुमच्यामुळे माझा पगार मिळालेला नाही. वरिष्ठ कार्यालयाला यातील पैसे दिले आहेत. तुम्हाला काम नसतानाही पगार दिल्यामुळे हे पैसे द्यावे लागतात, अशी तंबी देऊन महिलांकडे पैशाची मागणी केली.या महिलांनी संबंधित अधिकाऱ्याची तक्रार तालुका अभियान व्यवस्थापकांकडे केली. त्यानंतर व्यवस्थापकांनी संबंधित महिलांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. त्यानुुसार सहा समूह संसाधन महिलांनी लेखी तक्रार सादर केली.तक्रार दिल्यानंतर तासाभरातच त्यातील काही महिलांवर दबाव आणल्याने तक्रार नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली.

आठवडाभरातच संबंधित अधिकाऱ्यांकडून दबाव येऊ लागल्याने, तक्रारदार महिलांनी धास्ती घेतली. त्यातील दोन महिलांनी समूह संसाधान व्यक्ती पदाचा राजीनामा गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला. तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील ही लाचखोरी बंद करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे. 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळSangliसांगली