शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

महावितरणच्या लाचखोर लिपिकाला अटक

By admin | Updated: May 22, 2014 00:41 IST

इस्लामपुरातील प्रकार : हजाराची लाच घेताना पकडले

इस्लामपूर : शेतीपंपाचे वीज बिल कमी करण्यासाठी शेतकर्‍याकडून एक हजाराची लाच घेताना ‘महावितरण’च्या कनिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. शिवाजी रंगराव पाटील (वय ३९, रा. इटकरे, ता. वाळवा) असे त्याचे नाव आहे. येथील वीज मंडळाच्या उपविभागीय कार्यालय क्रमांक २ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. आज, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या कारवाईने शहरात खळबळ माजली होती. पाटील याला अटक केल्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १२ हजारांची रोकडही मिळाली. तिचाही पंचनामा केला. शिवाजी पाटील याने ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील शेतकर्‍याकडे शेतीपंपाचे वीज बिल कमी करण्यासाठी हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर संबंधित शेतकर्‍याने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. यानुसार शिवाजी पाटीलने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यावर आज कार्यालयाजवळ सापळा लावला. पाटील कार्यालयात आल्यानंतर त्याने या शेतकर्‍याकडून एक हजार रुपयांची लाच घेतली. तेव्हाच ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या पथकाने त्याला पकडले. या विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी शासकीय कर्मचार्‍यांनी लाचेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले . (वार्ताहर) अनुकंपा तत्त्वावर नोकरी महावितरणच्या सेवेत असताना शिवाजीचे वडील रंगराव पाटील यांचा विजेच्या खांबावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शिवाजी वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सेवेत रुजू झाला होता. आज केवळ एक हजार रुपयांच्या लालसेपोटी त्याच्याकडून लाच स्वीकारण्याचे कृत्य घडले आणि त्याच्यावर कोठडीत जाऊन बसण्याची वेळ आली.