शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ भ्रूणहत्याकांडाची चौकशी पूर्ण

By admin | Updated: May 16, 2017 00:08 IST

म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणाची शासनाने नियुक्ती केलेल्या समितीची चौकशी पूर्ण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणाची शासनाने नियुक्ती केलेल्या समितीची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशीचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे, अशी माहिती शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सोमवारी दिली. पुढील आठवड्यात अंतिम अहवाल सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.म्हैसाळमधील खिद्रापुरे याच्या भारती रुग्णालयाच्या विविध प्रकारच्या बेकायदेशीर नोंदी, तसेच त्याने नेमके काय केले, याचा समितीने अभ्यास केला. अशाप्रकारच्या घडणाऱ्या घटनांसाठी कारणीभूत असलेल्या शासकीय यंत्रणेमधील दोष समितीने शोधले आहेत. या घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, हेही शासनाला सुचविले आहे.मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे यांच्या मृत्यूबाबत तांत्रिक बाबी, तसेच गर्भपातासाठी वापरली गेलेली औषधे कोठून आणली जात होती, खिद्रापुरेकडे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नसतानाही, त्याला ही औषधे कशी काय देण्यात आली, याचीही समितीने चौकशी केली आहे. शासनाने एक महिन्यात चौकशीचे काम पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची समिती होती. समितीची दोनवेळा बैठक झाली. प्रत्येकाला चौकशीची जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार समितीमधील सदस्यांनी चौकशीचे काम पूर्ण केले. त्यानंतर चौकशीतून पुढे आलेली माहिती, अशा घटना घडू नयेत, यासाठी काय करायला हवे, याबद्दलच्या उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. याचा एकत्रित प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला आहे. अंतिम अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाणार असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले.सातजणांची समितीअधिष्ठातांसह याच रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील महिला प्राध्यापिका,जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांचाप्रत्येकी एक प्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त व युनिसेफचे पुण्याचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मधुसूदन कर्नाटकी हे या समितीचे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी समितीचे सदस्य सचिव आहेत.खिद्रापुरेच्या जामिनावर उद्या निर्णयगर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह बाराजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील खिद्रापुरेसह सहाजणांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होऊन सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. न्यायालयाने १७ पर्यंत (बुधवार) जामिनावरील निर्णय राखून ठेवला आहे.