शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

‘सिव्हिल’च्या नव्या ओपीडीचे विघ्न हटले

By admin | Updated: October 19, 2015 23:41 IST

निविदा प्रसिद्ध : दोन इमारतींमध्ये अत्याधुनिक सुविधांचा समावेश; महिन्याभरात काम सुरू होणार

सचिन लाड ल्ल सांगली$$्निगेल्या चार-पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील नव्या ओपीडीचे विघ्न अखेर टळले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ओपीडीच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. येत्या महिन्याभरात बांधकाम सुरु होईल. ओपीडीच्या दोन इमारती असणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.इमारत उभारणी, दुरुस्ती अशा कामांसाठी केंद्र शासनाने चार वर्षांपूर्वी १८ कोटी रुपये सांगलीच्या शासकीय रुग्णालयास मंजूर केले आहेत. यापैकी साडेसहा कोटी रुपये नव्या ओपीडी इमारतीसाठी प्राप्तही झाले. सध्या हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्याहस्ते दोन वर्षापूर्वी ओपीडी इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीच्या कामाचा प्रस्ताव तयार करुन तो वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठविला होता. प्रशासकीय मंजुरीअभावी तेव्हापासून फाईल पडून होती. मंजुरी नसल्याने रितसर निविदा प्रक्रियाही करता येत नसल्याने हा निधी पडून होता. दोन महिन्यांपूर्वी सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ यांनी रुग्णालयास भेट देऊन ओपीडीचा विषय काढला होता, त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच काम सुरु केले जाईल, असे सांगितले होते. पण अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी यास विरोध केला. मंजूर झालेला निधी मिरजेसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. खा. संजयकाका पाटील, आ. गाडगीळ व आ. शिवाजीराव नाईक यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली. तावडे यांनी महिन्यापूर्वी याप्रश्नी बैठक लावली. बैठकीस त्यांनी खा. पाटील, आ. गाडगीळ, आ. नाईक व डॉ. डोणगावकर यांनाही आमंत्रित केले होते. यावेळी डोणगावकर यांना चांगलेच फैलावर घेऊन ओपीडी कामात हस्तक्षेप न करण्याची सूचना करुन तातडीने काम सुरुकरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या कामास गती आली.सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. प्रारुप निविदा मंजुरीसाठी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सादर केली. त्यास मंजुरी मिळाली आहे. येत्या महिन्याभरात बांधकाम सुरु होईल. पुन्हा भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यासाठी तावडे यांना आमंत्रित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. काय होणार : अशी असेल ओपीडीनव्या ओपीडीच्या दोन इमारती असणार आहेत. यामध्ये दोन मजली रक्तपेढी, लिफ्ट सातत्याने बंद रहात असल्याने स्ट्रेचर रॅम्प तयार केला जाणार आहे. एमआरआय, सिटीस्कॅन व कलर एक्सरे, डॉक्टरांना मार्गदर्शन केंद्र, डोळे तपासणी, क्षयरोग कक्ष, त्वचारोग, लहान मुलांचा कक्ष, डोळे तपासणी, भूल कक्ष, दंत तपासणी, एआरटी सेंटर, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकीय रेकॉर्ड कक्ष, लहान मुलांवर शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा तपासणी, परिचारिका कक्ष आदी विभाग असणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.आमदारांचे प्रयत्न मार्गीशिराळ्याचे आ. शिवाजीराव नाईक व आ. सुधीर गाडगीळ यांनी ओपीडीचे काम तातडीने सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.