शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या विकासकामांना खोडा, सत्ताधाऱ्यांची कामे सुसाट; सांगली जिल्ह्यातील स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 12:46 IST

जिल्ह्यातील सुमारे हजार कोटीच्या कामांना ब्रेक

सांगली : विकासकामांमध्ये राजकारण करू नये, असे तत्त्वज्ञान वारंवार पाजळले जाते; मात्र कृतीत ते दिसत नाही. सत्ताबदल झाला की श्रेयाचे राजकारण सुरू होतेच. सध्या भाजप व शिंदे गटाची सत्ता राज्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे हजार कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. विरोधी पक्षाच्या लोकांनी मंजूर केलेल्या कामांना खोडा घालून सत्ताधाऱ्यांनी त्यांची कामे गाजावाजा करून सुरू केली आहेत.सांगली जिल्ह्यात विकासकामांवरून राजकारण रंगले आहे. विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट)च्या आमदार, पदाधिकारी, नेत्यांनी तसेच नियोजन समितीमधील सदस्यांनी मागील सत्ताकाळात मंजूर करून आणलेल्या सर्व कामांना अद्याप स्थगिती आहे.

स्थगितीच्या आडून सत्ताधारी लोकांनी सुचविलेल्या कामांना हिरवा कंदील दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे. विरोधकांना कोणत्याही कामाचे श्रेय मिळू नये, याची तजवीज नव्या सत्ताधाऱ्यांनी केली आहे; पण ही जनतेची कामे आहेत, याचे भान त्यांना राहिलेले नाही. त्यामुळे या विचित्र राजकारणात जनता भरडली जाणार आहे.

विकास खड्ड्यात, राजकारण शिखरावरगेल्या अनेक वर्षांत जिल्ह्याच्या विकासाच्या संकल्पना मांडल्या जात असताना त्या सत्यात उतरत नाहीत. अजूनही विकासाच्या बाबतीत जिल्हा मागासलेलाच म्हणून ओळखला जातो. राजकारणात मात्र नेहमीच हा जिल्हा शिखरावर असतो.

कामे राजकारण्यांची नव्हे, जनतेचीच असतातआमदार, खासदारांचा फंड, जिल्हा नियोजनमधील निधी हा कोणत्याही वैयक्तिक कारणास्तव वापरला जात नाही. त्यावर प्रशासकीय नियंत्रण असते. मंजूर होणारी कामे सार्वजनिक व नियमांच्या अधीन असतात. तरीही त्यांना खो घालण्याने काय साध्य होते, हे आजवर जनतेला कळालेले नाही.

आमदार म्हणून कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर केली; मात्र सरकार बदलल्यानंतर लगेचच त्यांना स्थगिती देण्यात आली. विकासकामांमध्ये राजकारण आणण्यामुळे काय साध्य होणार आहे? चुकीचा पायंडा नव्या सरकारच्या काळात पाडला गेला आहे. - आमदार विक्रम सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस 

जनतेने मागणी केल्यानंतर काही कामे प्रस्तावित केली जातात. नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या घरातील कामे कधीही मंजूर होत नसतात. त्यामुळे अशा विकासकामांमध्ये राजकारण आणणे चुकीचे आहे. सकारात्मकपणे विकासकामांकडे पाहिले पाहिजे. - संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण