पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार, दि. २ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नांद्रे येथील बैलगाडी कारखान्यासमाेर हा अपघात घडला. फिर्यादी दीपक माळी यांचा मुलगा श्रेयस हा मैदानावर खेळून घरी परत येत असताना सांगली-वसगडे मार्गावर चव्हाण यांच्या दुचाकीने त्यास धडक दिली. त्यात तो जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगली ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद आहे.
नांद्रेत दुचाकीच्या धडकेत मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST