शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सांगलीतील खूनप्रकरणी पुतण्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:21 IST

सांगली येथील आपटा पोलीस चौकीजवळील हितेश जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात हातोडा घालून खून केल्याप्रकरणी त्यांचा सख्खा पूतण्या सूरज पारेख व त्याचा मित्र सौरभ कुकडे या दोघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देसांगलीतील खूनप्रकरणी पुतण्यासह दोघांना अटकघरातून बाहेर काढल्याने कृत्य मित्राच्या मदतीने काढला काटा

सांगली : येथील आपटा पोलीस चौकीजवळील हितेश जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात हातोडा घालून खून केल्याप्रकरणी त्यांचा सख्खा पूतण्या सूरज पारेख व त्याचा मित्र सौरभ कुकडे या दोघांना अटक केली आहे.

अवघ्या २४ तासात या खुनाचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले. हितेश पारेख यांनी सूरजला घरातून बाहेर काढले होते. त्यामुळे आता रहायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाल्याने सूरजने सौरभच्यामदतीने पारेख यांचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.मंगळवारी रात्री हितेश पारेख व त्यांची आई कमल पारेख (वय ८१) यांच्या डोक्यात हातोडा घालण्यात आला होता. दुसऱ्यादिवशी (बुधवार) सकाळी दहा वाजता हा प्रकार उघडकीस आला होता. कमल या बेशुद्ध होत्या, तर हितेश मरण पावले होते.

कमल यांना तातडीने उपचारासाठी हलविले. त्यांचा सायंकाळी जबाब नोंदवून घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे तपासाला योग्य दिशा मिळाली. संशयाची सूई सूरजकडे वळल्याने रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली.|सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तेंव्हापासून सूरज व त्याच्या बहिणीचा हितेश पारेख यांनी सांभाळ केला होता. बहिणीचे काही वर्षापूर्वी लग्न झाले आहे. सूरज हा हितेश आज्जी कमल पारेख यांच्याकडे आपटा पोलीस चौकीजवळ श्री अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक पाचमध्ये राहत होता.

तो काहीच कामधंदा करीत नाही. व्यसनाच्या आहारी गेला होता. मित्रांकडून ऊसने पैसे घेत असे. पैशावरुन त्याचे अनेकांशी भांडण झाले होते. ही भांडणे घरापर्यंत येत होती. त्यामुळे हितेश पारेख यांनी सूरजला अनेकदा खडसावले होते. तुझ्या वर्तणुकीत सुधारणा नाही झाली तर, तुला घरातून बाहेर काढणार, असे त्यांनी सांगितले होते. पण मात्र तरीही सूरजच्या वर्तणुकीत बदल झाला नाही.

गेल्या आठवड्यात हितेश पारेख यांनी सूरजला घरातून बाहेर काढले. याचा सूरजला राग आला. आता रहायचे कुठे? असा त्याला प्रश्न पडला. घरावर माझाही हक्क असताना मला बाहेर काढणारे हे कोण? असे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. यातून त्याने मित्र सौरभ कुकडे याची मदत हितेश पारेख यांचा खून केला. त्यानंतर आज्जी कमल पुढे आल्यानंतर त्यांच्याही डोक्यात हातोडा घातला होता. 

टॅग्स :SangliसांगलीMurderखून