शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

सभापती निवडीत दोन्ही काँग्रेस एकत्र!

By admin | Updated: June 7, 2014 00:20 IST

‘स्वाभिमानी’ला धक्का : पाच पदे काँग्रेसकडे, तर एक राष्ट्रवादीकडे

सांगली : महापालिकेच्या विविध समिती सभापती निवडीत स्वाभिमानी विकास आघाडीला दूर सारून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये समझोता झाला. धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता असतानाच काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर समझोता करून प्रभाग क्रमांक तीनचे सभापतीपद राष्ट्रवादीला देऊन इतर पाच ठिकाणी स्वत:चे सदस्य निवडून आणले. प्रभाग समिती क्रमांक दोन येथेच केवळ निवडणूक झाली. इतर सर्व सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या. प्रभाग समिती १ मध्ये पुरुषोत्तम ऊर्फ बाळासाहेब मुरलीधर काकडे यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग २ च्या सभापतीपदी काँग्रेसच्या शकुंतला दत्तात्रय भोसले यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या अश्विनी हेमंत खंडागळे यांचा तेरा मतांनी पराभव केला. भोसले यांना १७, तर खंडागळे यांना ४ मते पडली. प्रभाग समिती तीन येथे राष्ट्रवादीच्या सौ. स्नेहा संजय औंधकर व प्रभाग समिती चार येथे सभापतीपदी काँग्रेसच्या मालन चंद्रकांत हुलवान यांची बिनविरोध निवड झाली. गुंठेवारी समिती सभापतीपदी काँग्रेसच्या शालन मारुती चव्हाण व मागासवर्गीय दलित वस्ती सुधार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्याच शेवंता गोपाळ वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी काम पाहिले. निवडीनंतर महापालिकेसमोर सभापती निवडी झालेल्या सभापतींच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची उधळण करण्यात आली. दुचाकीवरून शहरात रॅलीही काढण्यात आली. (प्रतिनिधी)