भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील साने गुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने मे महिन्यात सेवानिवृत्त होऊन गावी आलेल्या सुहास चौगुले व सुनील चौगुले या जवानांचा पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.
केंद्रप्रमुख सुभाष कवडे व माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष आप्पा गोरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कवडे म्हणाले की, विद्यार्थ्यांना सैनिकांबद्दल आदर वाटावा व राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या हेतूने हा समारंभ आयोजित केला जातो.
स्वागत संघटनेचे सचिव जी. के. शेख यांनी केले, तर कयूम पठाण यांनी आभार मानले. यावेळी माजी सैनिक संघटनेच्यावतीनेही दोन्ही जवानांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
फोटो -
भिलवडी येथे माजी सैनिकांचा सत्कार करताना सुभाष कवडे, कुमार पाटील, जी. के. शेख आदी.