शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: मिरजेत आयपीएल क्रिकेट बेटिंगसाठी बुकी सरसावले, ऑनलाईन ॲपद्धारे सट्टा

By श्रीनिवास नागे | Updated: March 28, 2023 17:07 IST

महाराष्ट्रातून कोट्यवधीची उलाढाल

सांगली : आयपीएल क्रिकेट बेटिंगवर सट्टेबाजारासाठी मिरजेतील बेटिंग बुकी सरसावले आहेत. बुकींसाठी पर्वणी असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होत असल्याने मिरजेतून ऑनलाईन बेटिंग ॲप कार्यान्वित झाले आहेत.दरवर्षी आयपीएल क्रिकेटवर बेटिंगमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. बेटिंगच्या जुन्या पद्धतीऐवजी बुकींनी ऑनलाईन बेटिंग ॲप आणले आहे. ट्रिपल नाईन डॉट कॉम व एक्स बुक अशा वेगवेगळ्या नावाने मिरजेतील बुकींनी बेटिंग ॲप सुरू केले आहे. या ॲपवर प्रत्येक सामन्यात प्रत्येक बाॅल, प्रत्येक ओव्हरला होणाऱ्या धावा, गोलंदाजाचे एकूण बळी, सामन्यात होणाऱ्या धावा, कोणता संघ जिंकणार, यावर बेटिंग लावण्यात येते. या बेटिंग ॲपमधून पश्चिम महाराष्ट्रातून कोट्यवधीची उलाढाल होण्याचा अंदाज असून यासाठी बुकींची लगबग सुरू आहे. सट्टा लावणाऱ्या ग्राहकांसाठी नेमलेल्या एजंटांकडे रक्कम जमा करून आयडी व पासवर्ड घेऊन ऑनलाईन बेटिंग लावता येते. मिरजेत एका हॉटेलवरून ॲपचे कामकाज चालते. मिरजेतील आफताब, अमित, रमजान, सादिक नामक बुकींचे बेटिंग ॲप सुरू आहे. यातील काही बुकींनी आखाती देशात तळ ठोकून तेथून ऑनलाईन बेटिंगची तयारी केली आहे. मिरजेत एका महिन्यापूर्वी झालेल्या बॅंक ग्राहकांच्या फसवणुकीतील मोठी रक्कम क्रिकेट बेटिंगवर उधळल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी काही बेटींग बुकी पोलिसांच्या रडारवर आहेत.कर्नाटक पाेलिसांचे मिरजेत छापेआयपीएल सट्टाबाजारात मिरजेसह कर्नाटक सीमाभागातून कोट्यवधीची उलाढाल होते. गतवर्षी बेळगाव जिल्ह्यात आयपीएल बेटिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात मिरजेतील काही बुकींची नावे निष्पन्न झाली हाेती. कर्नाटक पोलिसांनी मिरजेत छापा टाकून बुकीला ताब्यात घेतले. मात्र स्थानिक पोलिसांचे या बुकींकडे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :SangliसांगलीIPLआयपीएल २०२३