शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
2
कुलदीप सेंगरचा जामीन रद्द; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
3
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
4
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
5
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
6
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
7
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
8
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
9
Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
10
टीम इंडियाविरुद्ध चुलत भाऊ कॅप्टन झाला; दुसरीकडे संधी मिळेना म्हणून स्टार ऑलराउंडरनं क्रिकेट सोडलं
11
Health Tips: गुडघेदुखीने त्रस्त आहात? मग 'रिव्हर्स वॉकिंग' करून पहा; २ मिनिटांत मिळेल आराम!
12
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
13
FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड
14
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
15
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
16
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
17
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
18
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
19
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
20
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात साडेतेवीस लाखांचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:36 IST

सांगली : इस्लामपुरातील उरुणवाडी (ता. वाळवा) येथे गरुड सीड्स कंपनीच्या नावाने बोगस सोयाबीन बियाणे निर्मिती होत असल्याचे उघडकीस आले. ...

सांगली : इस्लामपुरातील उरुणवाडी (ता. वाळवा) येथे गरुड सीड्स कंपनीच्या नावाने बोगस सोयाबीन बियाणे निर्मिती होत असल्याचे उघडकीस आले. कृषी विभागाने मंगळवारी छापा टाकून २३ लाख ५३ हजार ५०० रुपयांचे बियाणे जप्त केले. याप्रकरणी कंपनीचा मालक प्रणव गोविंद हसबनीस याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

उरुणवाडी येथे बोगस बियाणे तयार होत असल्याची तक्रार कृषी अधिकारी संजय बुवा यांच्याकडे आली होती. त्यानुसार जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक सुरेंद्र पाटील, स्वप्नील माने, तालुका कृषी अधिकारी भगवान माने, बंडा कुंभार यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजता उरुणवाडी येथे छापा टाकला. यावेळी महिला मजुरांमार्फत सोयाबीन निवडण्याचे काम सुरू होते. गोदामाच्या आतील बाजूस बियाणे प्रक्रियेचे यंत्र होते. तेथे छापील पिशवीमध्ये बियाणे भरण्याचे काम सुुरू होते. प्रत्येक पिशवी २५ किलोची होती. त्यावर सोयाबीनचा वाण : केडीएस ७२६, लॉट क्रमांक : ऑक्टोबर २०२१, बॅग भरण्याची तारीख : दि. २४ फेब्रुवारी २०२२ असे लिहिले आहे. २५ किलोच्या पिशवीसाठी ४५०० रुपये दर आहे. उत्पादक व विक्रेता गरुड सीडस असल्याचे पिशवीवर छापले आहे. संबंधित बियाणे तयार करणाऱ्या कंपनीचा मालक प्रणव हसबनीस याच्याकडे अधिकाऱ्यांनी परवान्याची मागणी केली. यावेळी त्याने परवाना दाखविला. त्यामध्ये बियाणे तयार करण्याचा उल्लेख नाही.

केवळ विक्रीचा परवाना असून त्यावर अंकुर सीड्स (नागपूर) या एकमेव कंपनीचा उल्लेख आहे. गरुड सीड्सने निर्मिती, साठवणूक व विक्री याबाबतचा परवाना घेतला नसल्याचे पथकाला दिसून आले. तेथील शेजारच्या चार खोल्यांची तपासणी केली. यावेळी केडीएस ७४३ जातीचे २३१ पिशव्यांमध्ये ५७७४ किलो, केडीएस ७२६ जातीचे १९२ पिशव्यांमध्ये ४८०० किलो बियाणे सापडले. याचे बाजारमूल्य २३ लाख ५३ हजार ५०० रुपये आहे. हा साठा शंकास्पद असल्याने नमुने घेतले आहेत. सर्व बियाणे सील करून विक्री बंदचे आदेश दिले आहेत. गैरकारभाराबद्दल प्रणव हसबनीसवर गुन्हा दाखल केला आहे.

परवाना एकाची, विक्री दुसऱ्याचीच

प्रणव हसबनीसने अंकुर सीड्सच्या बियाणे विक्रीसाठी कृषी विभागाकडून परवाना घेतला आहे. पण, प्रत्यक्षात परवाना घेतलेल्या कंपनीचे बियाणे तिथे सापडलेच नाही. गरुड सीड्स या नावाने छुप्या पद्धतीने बियाणे तयार केले जात होते.

टॅग्स :Sangliसांगली