शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक : सांगलीतील डोंगरावर आढळले मृतदेह, एका तरुणासह दोन युवतींचा समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 13:32 IST

तिघांच्या मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. ही घटना आज, गुरुवार (ता.२३) सकाळी उघडकीस आली. याघटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.

तासगाव :  तालुक्यातील मणेराजुरीतील येथील शेकोबा डोंगरावर तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. या तिघांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली आहे.  यामध्ये एका तरुणांचा तर दोन युवतींचा समावेश आहे. तिघांच्या मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. ही घटना आज, गुरुवार (ता.२३) सकाळी उघडकीस आली. याघटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी), प्रणाली उद्धव पाटील(१९, मूळ गाव जायगव्हाण, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. मणेराजुरी) आणि हातीद (ता. सांगोला) अशी या मृत तिघांची नावे आहेत. यातील एका युवतीची अद्याप ओळख पटली नाही. बुधवारी रात्रीच्या सुमारास या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केले असावे,अशी शंका व्यक्त होत आहे.घटनास्थळी द्राक्ष बागेसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली सापडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून नोंद करण्याचे काम सुरू आहे.

प्रेमाचा त्रिकोण की आणखी कारण?

आत्महत्या केलेल्या हरीश जमदाडे या तरुणाचे नात्यातीलच प्रणाली या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा घटनास्थळावर होती. प्रणालीचे मूळ गाव जायगव्हाण असले तरी ती मणेराजुरीत नातेवाइकांकडे राहत होती. तिने साडी परिधान केली होती. घटनास्थळी हार-तुरे असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचे नियोजन केले असावे, असे बोलले जात आहे. मात्र, डोंगरावर येतानाच कीटकनाशकाची बाटली घेऊन आल्यामुळे त्यांनी नियोजन करूनच आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. शिवानी घाडगे ही तरुणी हतीद येथील असून, हरीशच्या मित्राची नातेवाईक असल्याची चर्चा होती. त्यामुळे तिघांची आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली की, आणखी काही कारणांमुळे झाली, याचा नेमका उलगडा रात्रीपर्यंत झालेला नव्हता.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी