शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 2:21 AM

पत्नीला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी ज्ञानेश्वर गोपाळ बामणे (वय ४०, रा. बसर्गी, ता. जत) या जावयाचा लाकडी खांबाला डांबून बेदम मारहाण करून निर्घृण खून केला.

सांगली : पत्नीला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी ज्ञानेश्वर गोपाळ बामणे (वय ४०, रा. बसर्गी, ता. जत) या जावयाचा लाकडी खांबाला डांबून बेदम मारहाण करून निर्घृण खून केला. सावळी (ता. मिरज) येथे शनिवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. ज्ञानेश्वरने लोखंडी पाईप डोक्यात घातल्याने त्याची पत्नी गीतांजली (३०) ही गंभीर जखमी झाली आहे.ज्ञानेश्वर याचा विवाह दहा वर्षांपूर्वी सावळीतील अण्णासाहेब गंगाराम शिंदे यांची मुलगी गीतांजली हिच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना आदित्य (११) व पार्थ (८ वर्षे) अशी दोन अपत्ये झाली. सावळीत उरूस सुरूआहे. यासाठी ज्ञानेश्वर कुटुंबासह आला होता. शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरून त्याचा पत्नी गीतांजलीसोबत वाद झाला. त्यानंतर तो आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री साडेबारा वाजता तो घरी आला. गीतांजली झोपली होती. त्याने तिच्यासोबत झालेल्या वादाचा रागातून लोखंडी पाईपने तिच्या डोक्यावर प्रहार केला. ती किंचाळताच वडील गंगाराम शिंदे व घरातील अन्य लोकानी धाव घेतली. पकडुन त्याला बेदम मारहाण केली.

टॅग्स :Murderखून