सांगली : ‘लोकमत’चे संस्थापक, स्वांतत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून रक्तदान महायज्ञाला सुरुवात झाली. शनिवारी आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पुजारवाडी येथे सकाळी दहा ते चार या वेळेत भवानीमाता मंदिराशेजारच्या जिल्हा परिषद शाळेत रक्तदान शिबिर होणार आहे. पुजारवाडीच्या सरपंच अनिता होनमाने, उपसरपंच चैत्राली मिसाळ यांच्या सहकार्याने हे शिबिर होत आहे. रविवार, ४ जुलै रोजी दिघंची (ता. आटपाडी) येथे ग्रामपंचायतीशेजारच्या महादेव मंदिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, उपसरपंच तेजश्री मोरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर होत आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
चौकट
जिल्ह्यातील रक्तपेढ्यांत दररोज शिबिर
१. राजारामबापू रक्तपेढी , इस्लामपूर
२. वसंतदादा पाटील रक्त केंद्र व रक्त विज्ञान संशोधन केंद्र, मिरज
३. वानलेस हॉस्पिटल ब्लड सेंटर, मिरज,
४. सांगली इंडियन रेडक्रॉस सोसायटी ब्लड सेंटर (शिरगावकर ब्लड सेंटर), सांगली
५. पद्मभूषण वसंतदादा पाटील (सिव्हिल सर्जन), शासन जनरल हॉस्पिटल ब्लड सेंटर, सांगली
६. एसएमटी अनिला कांतीलाल कोठारी रक्त केंद्र व विभाग, हेमेटो ऑन्कोलॉजी, मिरज, सांगली
७. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल ब्लड सेंटर, वानलेसवाडी, मिरज, सांगली
८. हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड सेंटर, सांगली
९. मिरज सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर, गुलाबराव पाटील संकुलाशेजारी, मिरज
१०. अक्षय रक्त केंद्र, आनंद नर्सिंग होमशेजारी, मिरज
११. श्री बसवेश्वर मानव विकास, ग्रामीण सेवाभावी संस्था, सांगली
१२. मिरज सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर, सांगली
१३. प्रकाश रक्त केंद्र व रक्तघटक विभाजन, सांगली
१४. मानस ब्लड सेंटर, मिरज
१५. शाश्वत रक्त केंद्र, मिरज
१६. सांगली सिव्हिल रुग्णालय रक्तपेढी, सांगली