इस्लामपूर : ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २ जुलैपासून रक्तदान महायज्ञाला सुरुवात झाली आहे. इस्लामपूर येथे आज मंगळवार, दि. ६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
इस्लामपूर येथील उर्द्दू हायस्कूलसमोरील जायन्ट्स हॉल येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने, कार्यवाह रणजित जाधव, खजिनदार अॅड. श्रीकांत पाटील आणि जायन्ट्सचे पदाधिकारी शिबिराचे संयोजन करत आहेत. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रवींद्र सबनीस, डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. पी. टी. शहा, डॉ. राणोजी शिंदे, उद्योजक सर्जेराव यादव, आगारप्रमुख शर्मिला घोलप-पाटील, महाडिक युवा मंचचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, नगरसेवक शहाजीबापू पाटील, नगरसेविका सुनीता सपकाळ, खंडेराव जाधव, आनंदराव पवार, वैभव पवार, सनी खराडे, राहुल नागे, माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. शहरातील रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’ व ‘जायन्ट्स’कडून करण्यात आले आहे.