मिरज तालुक्यातून भाजप हद्दपार करणार : मनोज शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:27 IST2021-04-24T04:27:09+5:302021-04-24T04:27:09+5:30

मिरज : मिरज तालुक्यातून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आगामी जिल्हा परिषद ...

BJP will expel from Miraj taluka: Manoj Shinde | मिरज तालुक्यातून भाजप हद्दपार करणार : मनोज शिंदे

मिरज तालुक्यातून भाजप हद्दपार करणार : मनोज शिंदे

मिरज : मिरज तालुक्यातून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचे प्रतिपादन मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केले.

खटाव (ता. मिरज) येथील भाजप व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार होते. मोहनराव शिंदे साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात खटाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी सोसायटी संचालक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील, मनोज शिंदे, प्रा. प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचा मनोज शिंदे यांनी सत्कार करून मिरज पूर्व भागात पक्षवाढीचे आवाहन केले. प्रा. प्रमोद इनामदार यांनी स्वागत केले. गंगाधर तोडकर यांनी आभार मानले.

Web Title: BJP will expel from Miraj taluka: Manoj Shinde