शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Congress Jan Sangharsh Yatra भाजपकडून सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:54 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वट्टेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत,

ठळक मुद्देवसंतदादांचे विचार आम्हाला बळ देतील

सांगली : केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वट्टेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी केली.

जनसंघर्ष यात्रेनिमित्त सांगलीत आलेल्या काँग्रेस नेत्यांनी रविवारी सकाळी येथील वसंतदादांच्या स्मारकस्थळी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, प्रकाश सातपुते, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील आदी उपस्थित होते.

यानंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, वसंतदादांचे विचार नेहमीच आम्हाला प्रेरणा देणारे ठरले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करीत लोकांसाठी कार्यरत राहण्याची त्यांची कार्यपद्धती स्फूर्तिदायी आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसजन आज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी याठिकाणी आलो आहोत. संपूर्ण राज्यातील जनता काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला प्रतिसाद देत आहे. सांगली जिल्ह्यातही वसंतदादांवर व त्यांच्या विचारावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे येथील जनताही आमच्या पाठीशी राहील, याचा विश्वास आहे.

भाजप सरकार सत्तेसाठी वाट्टेल त्या गोष्टी करीत आहे. सत्ता उपभोगताना त्यांनी कधीही जनतेच्या हितासाठी काम केले नाही. राज्यातील व देशातील जनता अनेक प्रश्नांना सामोरी जात आहे. असेच चालत राहिले, तर सामान्य माणसाचे जगणे मुश्किल होईल. त्यामुळेच सरकारच्या चुकीच्या धोरणांची चर्चा करतानाच, लोकांशी संवाद साधण्याचे कामही आम्ही या यात्रेच्या निमित्ताने करीत आहोत. त्यास प्रतिसाद मिळत आहे.आरक्षणाबाबत सरकारकडून दिशाभूलजत : चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात धनगर समाजाला आरक्षण देतो, असा शब्द देऊनही भाजपने तो पाळला नाही. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सर्वसामान्यांना भूलथापा देऊन सत्तेवर आलेले हे सरकार बदलण्याची वेळ आता आली आहे. जत विधानसभेची जागा काँग्रेसच्या पारड्यात पाडणार असून त्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केले. जत येथे तालुका काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुय्यम बाजार आवार परिसरात आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. 

टॅग्स :SangliसांगलीCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा