जत : रामपूर (ता. जत) येथील सर्व सेवा सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत उपस्थित
होते.
यावेळी माजी सरपंच मारुती पवार, विकास सोसायटीच्या विद्यमान संचालक व बाजार समितीच्या माजी संचालक भाग्यश्री पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य मारुती ठवरे, सरपंच रखमाबाई कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ओलेकर, गोकुळा निळे, निलाव्वा चव्हाण, बालिका माळी, मायावती मंडले. युवराज घाटके, सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी लोखंडे, विकास सोसायटीचे संचालक पांडुरंग सोनुर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आवडाप्पा भोसले, माजी सरपंच शारदा पाटोळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी आमदार विक्रम सावंत म्हणाले, रामपूर मल्हाळ पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेस पक्षाला आता बळ मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक व बाजार समिती निवडणुकीत निश्चितच याचा फायदा होईल.
फाेटाे : ०६ जत १
ओळ : जत येथे रामपूर मल्लाळ येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.