शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापुरावरून भाजप-राष्टवादी, काँग्रेसमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 19:00 IST

महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्यावतीने पडळकर यांच्यावर टीका करण्यात आली.

ठळक मुद्देमहापुरावरून भाजप-राष्टवादी, काँग्रेसमध्ये जुंपलीआपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका

सांगली : महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्यावतीने पडळकर यांच्यावर टीका करण्यात आली.आ. पडळकर यांनी मंगळवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर आपत्तीपूर्व नियोजनावरून टीका केली होती. पडळकर म्हणाले होते की, मागील महापुराचा अंदाज घेऊन यावेळी उपाययोजना करणे गरजेचे होते. जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये अद्याप बोटी दिलेल्या नाहीत.

भविष्यात महापुराच्या माध्यमातून एखादी दुर्घटना घडली, तर पालकमंत्री जयंत पाटील व शासन त्यास जबाबदार राहील. खासदार संजयकाका पाटील यांनीही, स्थानिक नेत्यांना महत्त्वाच्या बैठकांना डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली होती.

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना बेदखल करण्याबाबतचा हा मुद्दा भाजपचे सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनीही उपस्थित केला होता. भाजप नेत्यांनी एकीकडे जयंत पाटील यांच्यावर टीका सुरू केली असताना, युवक राष्ट्रवादी व काँग्रेसच्यावतीने पडळकरांवर हल्लाबोल केला आहे.युवक काँग्रेसचे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष अजित दुधाळ यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अद्याप पूर आला नसताना आपत्तीचे, दुर्घटनांचे संभाव्य चित्र निर्माण करून पडळकर पालकमंत्री व शासनास जबाबदार ठरविण्याची तयारी करीत आहेत. त्यांची टीका ही द्वेषातून व स्वार्थापोटीची आहे.

मागील महापुरावेळी राज्यात भाजप सत्तेवर होते. त्यावेळी जिल्ह्यात दुर्घटना घडली. आपत्ती काळातील नियोजन फसले होते. त्यामुळे त्याची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवायची का? मागील महापुरातील नियोजनाबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि त्यानंतर आपत्तीपूर्व नियोजनावर बोलावे, असे आवाहन त्यांनी केले.युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार म्हणाले की, मागील महापुराच्या काळात भाजपने काय नियोजन केले? भाजपचे नेते तेव्हा कुठे होते, ते स्वत: कोठे होते हे स्पष्ट करावे. महापुरात जनता तळमळत असतानाही भाजपच्या तत्कालीन मंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतली. विरोधात असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांनी कर्तव्यभावनेने पूरग्रस्तांना मदत केली.

टॅग्स :PoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली