शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत भाजप-राष्टवादीत हाणामारी, दगडफेक : ६७ जणांविरुध्द गुन्हा, कुरणे-हारगे गट आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:52 IST

मिरज : येथील बुधवार पेठेतील गणेश मिरवणुकीत फटाके फोडून नाचल्याच्या व वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून भाजप चे माजी नगरसेवक महादेव कुरणे व राष्टवादीच्या नगरसेविका संगीता हारगे यांच्या गटात गुरुवारी तुफान मारामारी झाली. चाकूहल्ला व दगडफेकीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मारामारीत दोन्ही गटाचे आठजण जखमी झाले असून पोलिसांनी संगीता हारगे, ...

ठळक मुद्देदोन्ही गटाचे आठ जखमी

मिरज : येथील बुधवार पेठेतील गणेश मिरवणुकीत फटाके फोडून नाचल्याच्या व वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून भाजपचे माजी नगरसेवक महादेव कुरणे व राष्टवादीच्या नगरसेविका संगीता हारगे यांच्या गटात गुरुवारी तुफान मारामारी झाली. चाकूहल्ला व दगडफेकीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मारामारीत दोन्ही गटाचे आठजण जखमी झाले असून पोलिसांनी संगीता हारगे, अभिजित हारगे, महादेव कुरणे यांच्यासह दोन्ही गटाच्या ६७ जणांवर दंगल व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

बुधवार पेठेत भाजपचे कुरणे व राष्टवादीचे हारगे यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. महापालिका निवडणुकीत महादेव कुरणे यांच्या पत्नी जयश्री आणि संगीता हारगे यांच्यात लढत होऊन हारगे विजयी झाल्या होत्या. त्यादरम्यान हारगे गटातील अनिल हारगे व अन्य काही कार्यकर्ते कुरणे गटात सहभागी झाल्याने, या दोन गटात कुरबुरी सुरू आहेत. गुरुवारी दुपारी अनिल हारगे, अभिजित कुरणे, सतीश हारगे यांच्यासह कुरणे समर्थकांनी घरगुती गणेशमूर्तीची ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून मिरवणूक काढली होती.

मिरवणूक बसवेश्वर चौकात आल्यानंतर तेथे हारगे गटाचे समर्थक टेम्पोत गणेशमूर्ती घेऊन थांबले होते. यावेळी कुरणे गटाचा ट्रॅक्टर रोखून फटाके वाजवत नाचल्याच्या कारणावरून हारगे समर्थकांनी कुरणे समर्थकांवर काठ्यांनी व चाकूने हल्ला चढविला. यावेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. हारगे समर्थकांनी अभिजित कुरणे यांच्या घरावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. मारामारीत कुरणे गटाचे अमित कुरणे, पिंटू कुरणे, रविशंकर नकाते, सारिका हारगे, अनिता हारगे, तर हारगे गटाचे अभिजित हारगे, बाबूराव हारगे, उमेश मिरजे, अक्षय फुटाणे, योगेश तहसीलदार जखमी झाले.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाने बुधवार पेठेत जाऊन जमावाला पिटाळून लावले. मारामारीच्या घटनेमुळे दोन गटात तणाव निर्माण झाला होता. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारामारीप्रकरणी तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन्ही गटातील महिला परस्परांच्या अंगावर धावून गेल्याने पोलीस ठाण्यात गोंधळ निर्माण झाला होता.

पोलिसांनी दोन्ही गटाच्या ६७ जणांविरूध्द दंगल व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून दहाजणांना ताब्यात घेतले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन, अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.हारगे गटाच्या यांच्यावर गुन्हा दाखल...कुरणे गटाच्या सारिका हारगे यांनी नगरसेविका संगीता हारगे, अभिजित हारगे, मिलिंद हारगे, राधिका हारगे, पप्पू मंगावते, अण्णासाहेब हारगे, वैभव मंगावते, महेश नेर्लेकर, रोहित नेर्लेकर, अक्षय हारगे, अजित हारगे, उमेश मिरजे, बाबू हारगे, सुनील मंगावते, शहनवाज पटवेगार, यासिन मुल्ला, मनोज हारगे, मोरेश्वर हारगे, अक्षय फुटाणे, सुनील फुटाणे, नीलेश मंगावते, सुधाकर कोरे, महादेव मंगावते, शुभम शिवपुजे, संतोष मंगावते, महेश बसरगे, सुभव्वा मिरजे, मंजू हारगे, शोभा हारगे, सुनीता हारगे, अस्मिता हारगे, शेवंता नेर्लेकर, बाबा नेर्लेकर, मीनाक्षी नेर्लेकर, प्रभावती मंगावते, अनिता पाटील, जयश्री नेर्लेकर व रूपाली हारगे यांनी गणेशमूर्तीचे वाहन अडवून दगडफेक व काठीने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.कुरणे गटाच्या यांच्यावर गुन्हा दाखल...याप्रकरणी हारगे गटाच्या राधिका मिलिंद हारगे यांनी, अभिजित कुरणे, महादेव कुरणे, मांतेश कुरणे, शिवम ढंग, रितेश बसरगे, राकेश बसरगे, अभिजित कोरे, अनिल हारगे, शुभम हारगे, रवी हारगे, ओंकार हारगे, तुषार नकाते, आप्पाजी कोरे, स्रेहल कुरणे, सुमित कुरणे, सुरेखा कुरणे, महादेव मल्लाप्पा कुरणे, शंकर कुरणे, रावसाहेब कुरणे, मिलिंद जिरगे, विशाल कागवाडे, अमित कोरे, सुनीता कुरणे, संजीवनी कुरणे, आशा नकाते, प्रमोद हारगे, चिदानंद हारगे, रावसाहेब हारगे, प्रवीण गोरे यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली आहे.

मिरजेतील बुधवार पेठेत गुरुवारी भाजप व राष्टवादी समर्थकांत मारामारी व दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीस पथकाने जमावाला पिटाळून लावले.मिरजेतील बुधवार पेठेत गुरुवारी भाजप व राष्टवादी समर्थकांत मारामारी झाली.अभिजित कुरणे यांच्या घरावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या.

टॅग्स :SangliसांगलीGanpati Festivalगणेशोत्सव