शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारूंची उपमा- पृथ्वीराज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 19:53 IST

सांगली : बड्या धेंडांनी बँकांच्या माध्यमातून देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारुंची उपमा देत फिरत आहेत. त्यांचे हे स्वच्छ प्रतिमेचे सोंग आता लोकांनी ओळखले आहे, अशी टीका काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे केली.

सांगली : बड्या धेंडांनी बँकांच्या माध्यमातून देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारुंची उपमा देत फिरत आहेत. त्यांचे हे स्वच्छ प्रतिमेचे सोंग आता लोकांनी ओळखले आहे, अशी टीका काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे केली.भाजपाच्या युवा नेत्या पूनम महाजन यांनी नुकताच सांगली दौरा केला.यावेळी त्यांनी कॉंग्रेसला देशाचे लुटारू म्हणून संबोधले होते. या टीकेचा समाचार घेताना पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, भाजपामध्ये सहभागी झालेल्या आणि व्यासपीठावर बसलेल्या काही लोकांचा आढावा महाजन यांनी घेतला असता तरी त्यांनी अशा प्रकारची टीका केली नसती. ललित मोदी, नीरव मोदी यांनी देशाला करोडो रुपयांचा चुना लावून परदेश गाठले. त्यांना भाजपानेच अभय दिल्याचे चित्र आहे. अमित शाहांच्या पुत्राचीही चौकशी भाजपा सरकारने केली नाही. ना खाऊंगा, ना खाणे दुंगा अशी गर्जना करीत सत्तेवर आलेल्या भाजपाने आजवर अनेकांना खाऊ घातले. लुटीच्या घटना समोर आल्यानंतर या सर्वांना परदेशी जाताना भाजप नेते पाहत बसले. तरीही यांना देशाचे लुटारू विरोधी पक्षच वाटत आहेत. सांगलीत युवा परिषद घेऊन पक्षाच्या धोरणांचा गाजावाजा करणा-या पूनम महाजन यांनी किमान सांगलीत किती रोजगार उपलब्ध करून दिला, त्याची माहिती तरी जनतेला द्यायला हवी होती.तरुणांना बेरोजगार करून युवा मेळावे घेण्यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही. सत्तेवर येताच प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये ठेवण्याचे दिलेले आश्वासन गेले कुठे? येणारे हे पैसे नेमके गेले तरी कुठे, याचा खुलासा भाजप नेत्यांनी करावा. शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या आत्महत्या, बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या, व्यावसाय, उद्योजकांचे सुरू असलेले हाल या गोष्टींना भाजपच जबाबदार आहे. कधी नव्हे इतकी मंदी आणि आर्थिक टंचाई देशाने पाहिली तीसुद्धा भाजपच्या कृपेनेच. त्यामुळे कितीही स्वच्छत प्रतिमेचे सोंग आणले तरी जनता आता त्यास फसणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.महापालिकेत झेंडा कॉंग्रेसचाचकितीही आटापीटा केला तरी महापालिकेत कॉंग्रेसचाच झेंडा फडकणार आहे. सध्यस्थितीत उमेदवारही नसलेल्या भाजपचा कॉंग्रेसच्याच नगरसेवकांवर डोळा आहे. त्यामुळे आयात उमेदवारांवर भाजपने सत्तेचे स्वप्न बघू नये, असे पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस