शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

Maharashtra Vidhan Sabha 2019 : काँग्रेसला जे जमले नाही ते बदल भाजपने केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 16:04 IST

काँग्रेसच्या काळात एकही योजना पूर्णत्वास गेली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हून अधिक योजना आखल्या. देशाची दिशाच बदलली आहे. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल देवेंद्र फडणवीस सरकारने केला. नवभारत निर्मितीच्या संकल्पनेत नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

ठळक मुद्दे काँग्रेसला जे जमले नाही ते बदल भाजपने केलेगोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा संवाद कार्यक्रम

सांगली : काँग्रेसच्या काळात एकही योजना पूर्णत्वास गेली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हून अधिक योजना आखल्या. देशाची दिशाच बदलली आहे. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल देवेंद्र फडणवीस सरकारने केला. नवभारत निर्मितीच्या संकल्पनेत नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.सांगली विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ भाजपच्या प्रज्ञा सेलच्यावतीने महाजनादेश, महाचर्चा या संवाद कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. यावेळी महापौर संगीता खोत, प्रज्ञा सेलचे प्रदेशाध्यक्ष शिरीष देशपांडे, विधानसभा प्रभारी दीपक शिंदे-म्हैसाळकर, संजय परमणे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, सतीश मालू उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, भाजपचे सरकार अंत्योदय तत्त्वावर चालणारे आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना आखल्या. जनधन, सुकन्या, उज्ज्वला, आयुष्यमान अशा अनेक योजनेतून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले. याउलट काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले.

महाराष्ट्रातही त्यांची सत्ता होती. केवळ स्वार्थासाठी त्यांचा कारभार सुरू होता. एकही योजना अंमलात आणली नाही. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल फडणवीस सरकारने केला. विरोधकांना आरोप करण्यासाठी एकही मुद्दा नाही. सांगलीत आ. गाडगीळ यांनी कोट्यवधीची कामे केली आहेत. समाजातील प्रोफेशनल्समध्ये काम करणाऱ्या घटकांनी या बदलत्या राजकारणात सहभागी व्हावे, असे आवाहनही सावंत यांनी केले.यावेळी उद्योजक सतीश मालू, डॉ. भारती शिंदे यांचीही भाषणे झाली. संजय परमणे यांनी स्वागत केले. डॉ. रणजित जाधव, विजय पाटील, प्रमोद शिंदे, शैलेश पवार, बी. बी. सुल्ह्यान, विनायक शेटे, एस. एल. पाटील, अ‍ॅड. समीर पटवर्धन, सुनील माणकापुरे, डॉ. सुषमा पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाSudhir Gadgilसुधीर गाडगीळsangli-acसांगली