शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

भाजपमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची लागणार कसोटी

By admin | Updated: January 11, 2017 23:40 IST

सांगलीत हालचालींना वेग : शिराळा, खानापूर, आटपाडीत दोन्ही काँग्रेस एकत्र

सांगली : जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि पंचायत समितीच्या १२० गणांसाठी बुधवारपासून आचारसंहिता लागली आहे. दि. २१ फेब्रुवारीला मतदान होणार असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची उमेदवार निश्चितीसाठी धडपड चालू आहे. भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण शक्तीने निवडणूक मैदानात उतरल्यामुळे दोन्ही काँग्रेसची कसोटी लागणार आहे. दरम्यान, नेत्यांचे आदेश डावलून शिराळा, खानापूर, आटपाडी येथे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी केली आहे.जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी जिल्हाभर दौरे करून मतदारांशी संपर्क साधला आहे. उमेदवारी निश्चितीसाठी त्यांनी इच्छुकांशी चर्चाही केली आहे. बुधवारी जयश्रीताई पाटील आणि विशाल पाटील यांनी मिरज तालुक्यातील इच्छुकांच्या सांगलीत बैठका घेऊन निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील सध्या एकहाती किल्ला लढवित आहेत. त्यांना जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आम. मानसिंगराव नाईक, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. सुमनताई पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांचे सहकार्य लाभत आहे; परंतु राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजप व शिवसेनेत गेल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेत्यांची मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीची सत्ता टिकविण्याचेही जयंत पाटील यांच्यासमोर फार मोठे आव्हान आहे.भाजप प्रथमच पूर्ण शक्तिनिशी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या मैदानात उतरला आहे. खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर या नेत्यांनी जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलविण्याचा निश्चय केला आहे. त्यांना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांची भक्कम साथ मिळताना दिसत आहे.खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर हे शिवसेनेचे असल्यामुळे दोन तालुक्यांत शिवसेनेची निश्चितच ताकद वाढली आहे. येथील निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहेत. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे अभिजित पाटील लक्षवेधी लढत देण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळ, मिरज, जत येथेही शिवसेना, मनसे या पक्षांनी निवडणुकीची तयारी चालू केली आहे.मिरज, वाळवा, पलूस, शिराळा, तासगाव या तालुक्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाच्या माध्यमातून जनतेशी चांगला संपर्क आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे संघटनेचे मंत्री असल्यामुळे काही ठिकाणी त्यांना यश मिळणार आहे.आजवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशाच झाल्या आहेत. प्रथमच भाजप, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण शक्तीने निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यामुळे निवडणुकांचे तिरंगी चित्र निर्माण झाले आहे. सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३३, काँग्रेसकडे २३, विकास आघाडी तीन, जनसुराज्य शक्ती एक आणि अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, ती सत्ता टिकविणे जयंत पाटील यांच्यासमोर फार मोठे आव्हान आहे. काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण, भाजप, शिवसेनेचा त्यांच्यासमोर मोठा अडथळा आहे.