शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत अपुऱ्या पाणी पुरवठ्याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांना भाजपचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:09 IST

Water Sangli : सांगली वार्ड क्रं.१० मध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भाजप आणि आरपीआयचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आज सकाळी घेराव घातला. येथील पाणी अन्यत्र वळविल्याचा आरोप नगरसेवक जगनाथ ठोकळे यांनी केला असून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देसांगलीत अपुऱ्या पाणी पुरवठ्याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांना भाजपचा घेरावत्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा, नागरिकांनी केली मागणी

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : सांगली वार्ड क्रं.१० मध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भाजप आणि आरपीआयचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आज सकाळी घेराव घातला. येथील पाणी अन्यत्र वळविल्याचा आरोप नगरसेवक जगनाथ ठोकळे यांनी केला असून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये नवीन वसाहत, जासुद मळा, वडर काॅलनी, शिवाजीनगर, टिंबर एरिया, भिमनगर परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून अपुरा आणि कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. भाजप-आरपीआयचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे  आणि या परिसरातील नागरिकांनी आज सकाळी महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी, शाखा अभियंता अमिर मुलाणी तसेच पाईप निरीक्षक सतिश माळी यांना घेराव घालत जाब विचारला.

यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करा, अन्यथा महापालिकेवर घागर मोर्चा काढू असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. महापालिका पाणीपुरवठा विभागाने या भागातील पाणी अन्य ठिकाणी वळवले असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केला आहे. तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल असे आश्वासन उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिले आहे. पाणीपुरवठा विभागाकडे सक्षम अधिकाऱ्यांची गरज असून शासनाकडून अधिकारी उपलब्ध करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे     या भागांमध्ये जलवाहिनीला गळतील लागल्याची शक्यता आहे, यामुळे या भागामध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे, गळती शोधण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. सध्या कोरोनामुळे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी इतर कामाकडे  वळविण्यात आलेले आहेत, मनुष्यबळ कमी असल्याचा खुलासा पाणी पुरवठा विभागाने केला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली