शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शिवसेनेकडून आशिष शेलारांचा निषेध; तोंडाला काळे फासण्याचा इशारा

By अविनाश कोळी | Updated: November 17, 2022 20:23 IST

छत्रपतींची तुलना सावरकरांबरोबर केल्याने सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने त्यांचा निषेध करीत असल्याचे सांगितले.

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या पोटात छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचा लपलेला द्वेष ओठातून बाहेर आला आहे, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी केली. छत्रपतींची तुलना त्यांनी सावरकरांबरोबर केल्याने सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने त्यांचा निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

जाधव यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सावरकर निश्चितपणे मोठे असतील; परंतु तमाम हिंदुस्तानचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्य व शौर्याची तुलना सावरकरांसोबत करून शेलारांनी भारतीयांचा अपमान केला आहे. त्यांनी तमाम जनतेची तत्काळ जाहीरपणे माफी मागावी. शेलारांच्या या बेताल वक्तव्याबाबत सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत.

सवंग लोकप्रियतेसाठी सतत बेतालपणे वक्तव्य करणाऱ्या व सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या भाजपच्या नेत्यांनी आपली थोबाडे बंद करावीत, अन्यथा एक दिवस महाराष्ट्राची जनताच त्यांची थोबाडे बंद करतील. शेलार व अनेक भाजप नेत्यांच्या पोटात शिवरायांबद्दल द्वेष भावना आहे. यापूर्वी भाजपच्या एका नेत्याची शिवरायांबद्दलच्या द्वेषभावनेची ध्वनिफीत व्हायरल झाली होती. त्यामुळे हा द्वेष त्यांच्यात पूर्वीपासून भरला आहे. त्यामुळे त्यांना जनताच धडा शिकवेल, असे जाधव म्हणाले.

शेलारांना काळे फासू

आशिष शेलार यांनी तातडीने माफी न मागितल्यास सांगली जिल्ह्यात आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय शिवसैनिक व जनता शांत बसणार नाही, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारShiv SenaशिवसेनाSangliसांगली