शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जन्म-मृत्यूचे दाखले आता शासकीय रुग्णालयातच मिळणार, नागरिकांचे हेलपाटे वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 16:34 IST

पहिली प्रत मोफत असणार असून त्यापेक्षा अधिक प्रतीला पाच रुपये आकारले जाणार आहेत.

शरद जाधव

सांगली : जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी संबंधित महानगरपालिका, नगरपालिकेेतील हेलपाटे आता थांबणार आहे. शासनाच्या आदेशानुसार आता जन्म किंवा मृत्यू ज्या शासकीय रुग्णालयात झाला त्याच रुग्णालयात विहीत वेळेनंतर दाखला मिळणार आहे. पहिली प्रत मोफत असणार असून त्यापेक्षा अधिक प्रतीला पाच रुपये आकारले जाणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात याची नोंदणीची अंमलबजावणी सुरु झाली आहे.कोणत्याही रुग्णालयात जन्म अथवा मृत्यूची घटना घडल्यास त्याची महानगरपालिका, नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीमध्ये नोंद होत असते. संबंधितांना दाखले हवे असल्यास महिनाभरानंतर त्या त्या कार्यालयात हेलपाटेही मारावे लागत असत. शासनाच्या या निर्णयानुसार आता ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्याच रुग्णालयात २१ दिवसानंतर हे दाखले नागरिकांना मिळणार आहेत.

पाच रुपयांचा दाखला शंभर रुपयांना प्रकार थांबणारमहापालिका अथवा नगरपालिकेत दाखल्यासाठी नियमानुसार असलेली रक्कम तर घेतली जातेच शिवाय त्यापेक्षा अधिक चिरीमिरीसाठी अडवणुकीचेही प्रकार होत असतात. आता जुन्या दाखल्याशिवाय काही काम नसून, सर्व नोंद रुग्णालयातच असणार आहे.

कर्मचाऱ्यांची वाणवाशासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अगोदरच कमी आहे. त्यात या निर्णयाची अंमलबजावणी करताना किमान चार ते सहा कर्मचाऱ्यांची या कक्षाकडे नेमणूक करावी लागणार आहे. मात्र, कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णालय प्रशासनाची अडचणच होणार आहे.

२१ दिवसानंतर दाखले मिळणारजन्म अथवा मृत्यूची घटना झाल्यानंतर त्वरित दाखले मिळणार नसून, त्याची नोंद व इतर माहिती संकलित करणे आवश्यक आहे. त्यामुळे २१ दिवसानंतर हे दाखले मिळणार आहेत.

लूट थांबणार का?जन्म, मृत्यू दाखल्यासाठी नेहमीच नागरिकांची लुबाडणूक करण्यात येते. पाच रुपयांच्या दाखल्यासाठी ताटकळत थांबवून पैसेही काढले जातात. आता ही सोय रुग्णालयात होणार असली तरी ही लूट थांबणार का? हा सवाल कायम आहे.

शासन निर्देशानुसार रुग्णालयातच जन्म, मृत्यू नोंदणी करुन दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. एक मेपासून याची नोंद सुरू झाली असून, विहीत वेळेनंतर दाखले रुग्णालयातच देण्याची सोय करण्यात आली आहे. - डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल