शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत जैविक कचरा निर्मूलन प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:55 IST

वैद्यकीय नगरी अशी ख्याती असलेल्या मिरजेत महापालिकेचे वैद्यकीय कचरा निर्मूलन सयंत्र बंद असल्याने वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. वैद्यकीय कचरा नष्ट करण्याचे काम ठेकेदाराकडे सोपवून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. कचरा कोंडाळ्यात वैद्यकीय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत.

ठळक मुद्देमिरजेत जैविक कचरा निर्मूलन प्रकल्प बंद कोंडाळ्यात वैद्यकीय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू

सदानंद औंधे मिरज : वैद्यकीय नगरी अशी ख्याती असलेल्या मिरजेत महापालिकेचे वैद्यकीय कचरा निर्मूलन सयंत्र बंद असल्याने वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. वैद्यकीय कचरा नष्ट करण्याचे काम ठेकेदाराकडे सोपवून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. कचरा कोंडाळ्यात वैद्यकीय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत.मिरजेत सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. बेडग रस्त्यावर महापालिकेच्या कचरा डेपोजवळ वैद्यकीय कचरा जाळण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीअभावी गेली दोन वर्षे मिरजेतील वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प बंद आहे.

वैद्यकीय कचरा निर्मूलन सयंत्र चालविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. मात्र याबाबतच्या तक्रारीमुळे वैद्यकीय कचरा विल्हेवाटीची जबाबदारी इंडियन मेडिकल असोसिएशनकडे सोपविण्यात आली. मात्र वैद्यकीय कचरा निर्मूलन यंत्रणा बंद असल्याने मिरजेतील रुग्णालयांतील वैद्यकीय कचरा खासगी ठेकेदाराकडे देण्यात येतो.

महापालिका आरोग्य विभागाने वर्षभरापूर्वी मोहीम राबवून शहरातील अनेक रूग्णालय चालकांना २५ हजार ते लाखापर्यंत दंड केला आहे. मात्र रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची समस्या कायम आहे. दाट लोकवस्तीत व गल्ली-बोळात कंटेनरमध्ये टाकलेला वैद्यकीय कचरा आजुबाजूला पसरत आहे. यामुळे अस्वच्छता व मोकाट कुत्र्यांच्याही उपद्रवामुळे नागरिक हैराण आहेत. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नSangliसांगली