शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यशेती योजनेत जुन्या शेतकऱ्यांना डावलल्याने कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 15:03 IST

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Sangli : मत्स्यशेती योजनेसाठी प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना डावलून प्रशासनाने नव्याने अर्ज मागवले आहेत, त्यामुळे यादीतील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. नवी निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देमत्स्यशेती योजनेत जुन्या शेतकऱ्यांना डावललेप्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

सांगली : मत्स्यशेती योजनेसाठी प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना डावलून प्रशासनाने नव्याने अर्ज मागवले आहेत, त्यामुळे यादीतील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. नवी निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड गेल्या बुधवारी (दि.९) पुण्यात लकी ड्रॉ पद्धतीने झाली. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. गेल्यावर्षी लकी ड्रॉमधून राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्षा यादीत ठेवले गेले.

पुढील वर्षी प्राधान्यक्रमाने संधी मिळेल असे सांगितले होते. पण यावर्षी प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना संधी मिळालीच नाही. त्यांना डावलून प्रशासनाने पुन्हा नव्याने अर्ज मागवले. त्यामुळे जुन्या यादीतील शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भिती आहे.प्रधानमंत्री योजनेअंतर्गत विविध तलाव मत्स्यशेतीसाठी ठेक्याने दिले जातात. तेथे पिंजरा पद्धतीने मासेमारीसाठी शासन अनुदान देते. महिला शेतकऱ्यांना ६० टक्के, तर पुरुषांना ४० टक्के अनुदान मिळते. प्रकल्पानुसार महिलांना २१ लाख ६० हजार, तर पुरुषांना ११ लाख ५५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. गेल्यावर्षी प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांनी पुढील वर्षी संधी मिळेल म्हणून पैसे गुंतवले. लाखो रुपयांचे प्रकल्प उभारले. मात्र यंदा लकी ड्रॉमध्ये डावलल्याने ते कर्जात बुडाले आहेत.नव्या शेतकऱ्यांना संधी देण्यापूर्वी जुन्यांचाही विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांत शेकडो शेतकरी प्रतिक्षा यादीत आहेत. विशेषत: सातारा, पुणे व अहमदनगरमध्ये संख्या मोठी आहे.पिंजरा पद्धत मत्स्य संवर्धन शेतकरी संघटनेने शासनाकडे दाद मागिली आहे. विजय कणसे, अविनाश जाधव, हेमलता घाडगे, सुजाता जाधव, मुश्ताक मलबारी, मधुरा जाधव, सुरेखा चव्हाण, गणेश निकम आदींनी लकी ड्रॉ रद्द करण्याची मागणी केली आहे. योजनेत जुन्या शेतकऱ्यांना डावलल्याने कोट्यवधंचा फटकामहसुल देऊनही डावललेमत्स्यशेतीच्या ठेक्यासाठी हे शेतकरी शासनाला दरवर्षी महसुल जमा करतात, तरीही त्यांना डावलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी प्रतिक्षायादीचा प्राधान्यक्रम डावलून मनमानी केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारSangliसांगली