शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

दुचाकी चोरट्यांच्या टोळीस पकडले

By admin | Updated: July 16, 2015 23:21 IST

चौघांचा समावेश : १५ दुचाकी जप्त; कऱ्हाड, तासगाव तालुक्यातून चोरी

सांगली : रुग्णालय, महाविद्यालय, चित्रपटगृह यांसह गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. टोळीतील चौघांना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी त्यांनी तासगाव, कऱ्हाड तालुक्यातून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.अटक केलेल्यांमध्ये अमोल अधिक आपटे (वय २५, रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड), अजित नारायण मोहिते (२४) व अमोल चंद्रकात काळे (२८, दोघे रा. मांजर्डे, ता. तासगाव) व कऱ्हाड (जि. सातारा) येथील एक अल्पवयीन संशयित यांचा समावेश आहे. तिघांना न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गस्त घालणाऱ्या पोलीस पथकास हे चारही गुन्हेगार संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सापडलेल्या दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर, त्यांनी तासगावमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. एकापाठोपाठ एक अशा तब्बल १५ दुचाकी चोरल्याची त्यांनी कबुली दिली. चोरलेल्या दुचाकीचा क्रमांक बदलून त्यांनी पाच ते सात हजारात तिची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. चैनी आणि मौजमजा करण्यासाठीच त्यांनी दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.कऱ्हाड येथून चोरलेल्या दुचाकींची तासगाव, मांजर्डे परिसरात विक्री केली आहे, तर तासगावमधून चोरलेल्या दुचाकींची कऱ्हाड तालुक्यात विक्री केली आहे. गुरुवारी दिवसभर पोलिसांनी संशयितांना घेऊन, ज्यांना त्यांनी दुचाकी विक्री केली आहे, त्यांची भेट घेऊन त्या जप्त करण्याची कारवाई सुरु केली आहे. दुचाकी खरेदी करणाऱ्यांना साक्षीदार करण्याचे काम सुरू आहे. संशयितांविरुद्ध सातारा जिल्ह्यात दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद आहेत का, याचीही माहिती घेण्याचे काम सुरु आहे. यासाठी एक पथक रवाना करण्यात आले होते. रात्री उशिरा हे पथक सांगलीत दाखल झाले. (प्रतिनिधी)तपासाबाबत गोपनीयताचोरट्यांची टोळी हाताला लागली आहे. त्यांना रितसर अटक करुन पोलीस कोठडीही घेण्यात आली आहे. जप्त केलेल्या १५ दुचाकी पोलीस ठाण्यासमोर लावण्यात आल्या आहेत. तरीही याची प्रसारमाध्यमांना माहिती देण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही, तपास सुरु आहे, अद्याप दुचाकी जप्त करण्याची कारवाई सुरु आहे. तपासाची व्याप्तीही वाढत आहे. संपूर्ण तपास झाल्यानंतर सर्व माहिती देऊ, असे सांगितले. संयशितांची पोलीस कोठडीची शुक्रवारी मुदत संपणार आहे. यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात उभे करुन पोलीस कोठडीची मागणी केली आहे. अल्पवयीन संशयिताचे बालसुधारगृहात रवानगी होणार आहे.