शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

महापालिकेत काँग्रेसचाही झाला ‘बिग बझार’

By admin | Updated: April 22, 2015 00:27 IST

भाकीत उलटले : मिरज पॅटर्नच्या विस्तवाने सत्ताधाऱ्यांच्या छपरालाही आग

शीतल पाटील - सांगली जयंत पाटील यांच्या महाआघाडीचा बिग बझार होईल, असे भाकीत काही वर्षांपूर्वी माजी मंत्री मदन पाटील यांनी केले आणि ते खरे ठरले. मात्र त्याच वाक्याचे बूमरॅँग आता कॉँग्रेसवर उलटल्याने महाआघाडीपेक्षाही वाईट ‘बिग बझार’ कॉँग्रेसच्या सत्ताकाळात अनुभवास येत आहे. महाआघाडीच्या बिघाडीस जो मिरज पॅटर्न कारणीभूत ठरला, त्याच पॅटर्नच्या विस्तवाने आता कॉँग्रेसच्या छपरालाही आग लागली आहे. मिरज पॅटर्नचा अनुभव कसा होता?, असा प्रश्न जयंतरावांना महापालिका निवडणुकीनंतर विचारला होता. तेव्हा स्मितहास्य करीत ‘चांगलाच’ असे एका शब्दात त्यांनी उत्तर दिले होते. मिरजेतील पदाधिकाऱ्यांनी महाआघाडीच्या शेवटच्या दोन वर्र्षांत अक्षरश: धुमाकूळ घातला. त्याला काँग्रेसची साथ होती, हे नाकारून चालणार नाही. आता तीच मंडळी पुन्हा महापालिकेत निवडून आली, पण यंदा त्यांच्या खांद्यावर काँग्रेसचा झेंडा होता. सांगलीच्या जनतेनेही काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकत एकहाती सत्ता दिली. गेल्या पंधरा वर्षांत पालिकेच्या कारभाराचा खेळखंडोबा थांबून एकहाती कारभार व्हावा, एवढीच जनतेची अपेक्षा होती; पण आता ती फोल ठरू लागली आहे. काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी दोन वर्षांत एका विचाराने कारभार करता आलेला नाही. कधी भुयारी गटार योजनेवरून वाद होतो, तर कधी विकास कामांच्या निधीवरून! गेल्या पंधरा दिवसात तर काँग्रेसअंतर्गत संघर्षाने टोक गाठले आहे. पालिकेत महापौर, गटनेते, स्थायी समिती सभापती ही तीनही महत्त्वाची पदे मिरजेच्या कारभाऱ्यांकडे आहेत. या तीन पदाधिकाऱ्यांत एकवाक्यता नाही. सांगलीतील नगरसेवकांना तर कोणाचेच नेतृत्व नाही. या तीन पदाधिकाऱ्यांच्या मागे फरफटत जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नाही. स्वत:चे हितसंबंध जोपासण्यात मिरज पॅटर्नमधील नेतेमंडळी गुंतली आहेत. सध्या पालिकेतील काँग्रेसमध्ये उघडरित्या तीन गट पडले आहेत. एक महापौरांचा, दुसरा गटनेत्यांचा आणि तिसरा स्थायी सभापतींचा! तीन गटातून एकमेकांवर कुरघोड्या सुरू आहेत. स्थायी समिती सभेत गोंधळ घालणारे महापौर गटाचे, तर महासभेत दंगा करणारे सभापती व गटनेते गटाचे आहेत. महासभेतील ऐनवेळी घुसडलेले ठराव उधळून लावल्यात आले. त्याच वेळी स्थायी समितीचा गोंधळही चर्चेत आला. आता तर महापौरांनी काँग्रेसला घरचा आहेर देत, काही सदस्यांचे हितसंबंध जोपासण्यास नकार दिल्याने गदारोळ केल्याचा आरोप केला आहे. हा सारा प्रकार किळसवाणा असून, नगरसेवकांना जनतेच्या हिताशीे काहीच देणे-घेणे नाही, असेच म्हणावे लागले.सोमवारच्या महासभेत काँग्रेसमधील संघर्षाने पातळी सोडली. महापौरांविरोधात सारे एकवटले, पण त्याचवेळी महापौरांवरील राग नगरसचिवांवर काढण्यात आला. तो कितपत योग्य होता? याचे आत्मचिंतन काँग्रेसला करावे लागणार आहे.महाआघाडीने किमान तीन वर्षे एकमुखी कारभार केला होता. शेवटच्या दोन वर्षात जयंतरावांना हादरे बसले. त्यांचा बिग बझार झाला. पण काँग्रेसची अवस्था तर महाआघाडीपेक्षाही बिकट झाली आहे. सत्तेच्या पहिल्या वर्षापासूनच काँग्रेसमध्ये दुफळी झाली आहे. उलट काँग्रेसचाच बिग बझार झाल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या छपराला आग लागेल, असे कुठल्याच काँगे्रस कार्यकर्त्यांना वाटले नव्हते. पण आता आग लागली असून, ती विझविण्यासाठी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांना लक्ष घालावे लागणार आहे. हुकूमशाही व मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्यांना चाप लावावा लागेल. अन्यथा महाआघाडीप्रमाणे काँग्रेसची बिघाडी होण्यास विलंब लागणार नाही. नगरसचिवांची कोंडीमहासभेत नगरसचिवांना मारहाण होण्याची पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना घडली. आजपर्यंत अधिकाऱ्यांचे डोळे काढण्यापर्यंत नगरसेवकांची मजल गेली होती, पण आता थेट हातघाईवरच प्रकरण आले आहे. यापूर्वी शहर अभियंता सी. जी. सोनावणे यांना मारहाण झाली होती. त्या प्रकरणात मदन पाटील यांनी नगरसेवकांची बाजू उचलून धरली. पण नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्या मारहाणीचे प्रकरण वेगळे आहे. नगरसेवक व माजी पदाधिकाऱ्यांचा आततायीपणा त्याला कारणीभूत आहे. त्यामागे नगरसचिवांकडून ठरावाच्या प्रती मिळत नसल्याचा राग स्पष्ट होत होता. ठराव दिले जाऊ नयेत, यासाठी महापौरांचा नगरसचिवांवर दबाव असतो, तर नगरसेवक ठरावासाठी आग्रही असतात. या दुहेरी कात्रीत सापडल्याने नगरसचिवांची कोंडी झाली आहे.