शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे मिरजच्या वैभवात भर - पालकमंत्री खाडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 16:22 IST

मिरज : महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे मिरजच्या वैभवात भर पडेल. नागरिकांना आरोग्यासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची ...

मिरज : महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे मिरजच्या वैभवात भर पडेल. नागरिकांना आरोग्यासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.मिरजेत आरोग्य विभागाच्या शंभर खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे भूमिपूजन मंगळवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त सुनील पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मिरजेत शंभर खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय उभारण्यासाठी सुमारे ४७ कोटी खर्च करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिला व नवजात शिशुंना याचा लाभ होणार आहे. मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास २५ कोटी रुपयांची एमआरआय मशीन व सांगली सिव्हिलमध्ये दहा कोटी रुपयांचे सीटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सिव्हिल हॉस्पिटलला मल्टीपर्पज हॉस्पिटल जोडण्याचा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हे रुग्णालय बांधकामासाठी मिरजेत किसान चौकातील ५,२०९ चौरस मीटर जागा महसूल विभागाने आरोग्य विभागास दिली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी महसूल विभागाकडून आरोग्य विभागास जागा हस्तांतरित केल्याची कागदपत्रे यावेळी दिली.यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, माजी नगरसेविका डॉ. नर्गिस सय्यद यांच्यासह रुग्णालयातील, अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

शासनाच्या योजनांचा लाभ१०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे स्त्रियांसाठी स्वतंत्र आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, उपचार, जोखमीच्या गरोदर मातांची तपासणी व उपचार, गरोदर माता व स्तनदा माता यांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. नवजात व शिशु बालकांना अति दक्षता विभाग, एनबीएसयू, एनआयसीयू व एसएनसीयू अंतर्गत बालरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत. येथे अत्याधुनिक उपकरणे साहित्य उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयातील गंभीर महिला व नवजात बालकांवर येथे उपचार करता येणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजhospitalहॉस्पिटल