शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

महापुरानंतर उद्भवणाऱ्या आजारांपासून राहा सावधान! : सांगलीतील तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 23:35 IST

सांगली जिल्ह्यात यंदा मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या चार तालुक्यातील १0१ गावांना महापुराचा विळखा होता. तीन ते साडेतीन लाख लोकवस्तीला याचा फटका बसला आहे. महापूर ओसरत असताना आता व्हायरल व बॅक्टेरियल आजारांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसतर्कता बाळगल्यास नियंत्रण करता येणे शक्य

सांगली : महापुराचे संकट आता कमी होत असताना, अनेक प्रकारच्या आजारांच्या संकटाचे ढग दाटले आहेत. वेळीच उपाय व काळजी घेतल्यास यावर मात करता येणे शक्य आहे. त्यामुळे एकीकडे शासकीय आरोग्य विभाग मोहीम सुरू करीत असताना, नागरिकांनीही स्वत:च्या आरोग्याबाबत वेळीच उपाय केले पाहिजेत, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सांगली जिल्ह्यात यंदा मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या चार तालुक्यातील १0१ गावांना महापुराचा विळखा होता. तीन ते साडेतीन लाख लोकवस्तीला याचा फटका बसला आहे. महापूर ओसरत असताना आता व्हायरल व बॅक्टेरियल आजारांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. महापुरानंतर अतिसार, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ ए आणि ई, डेंग्यू, श्वसनविकार, त्वचाविकार यांचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे. अशावेळी संबंधित आजारांची लक्षणे दिसताच नागरिकांनी तातडीने वैद्यकीय मदत घेण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या आजाराकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.

आजार, लक्षणे आणि उपाय...

अतिसार : पाण्याच्या सततच्या संपर्कामुळे महापुरानंतर किंवा या कालावधितच अतिसार होऊ शकतो. तापासह किंवा तापाविना पातळ संडास होणे, ही याची प्रमुख लक्षणे आहेत. यावर वैद्यकीय उपचार घेतानाच पाणी उकळून शुद्ध करून प्यावे 

लेप्टोस्पायरोसिस : अशुध्द पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिसची लागण होते. जळजळ होणे, अंगदुखी, डोकेदुखी, ताप ही सर्वसाधारण लक्षणे असल्यास लेप्टोस्पायरोसिस ओळखावा. जर तुमच्या शरीरावर कुठेही कापलेले किंवा जखम असेल आणि तुमचा संपर्क पुराच्या पाण्याशी झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणत्याही लक्षणांची वाट न पाहता ओषधोपचार करून घेणे आवश्यक. हा ताप पाच ते सात दिवस राहिला तर रक्तचाचणीद्वारे याचे निदान केले जाते. महिनाभर खाण्यापिण्याचे पथ्य पाळले तर पुन्हा उद्भवत नाही. यावर दोनशे मिलिग्रॅमची डॉक्सिसायक्लिन गोळी आठवड्यातून एकदा पूर असेपर्यंत ंिकवा शंभर मिलिग्रॅमची गोळी सात दिवस दोनवेळा घ्यावी.

कावीळ : अशुध्द पाणी व अन्न यामुळे पावसाळ्यात कावीळ हा आजार होऊ शकतो. कावीळ मुख्यत्वे विषाणू ए आणि ईमुळे होते. थकवा, लघवीचा व डोळ्यांचा रंग पिवळसर होणे, उलटी, यकृतामध्ये बिघाड आदी लक्षणे दिसून आल्यास तपासणी करावी. डोळे लालसर होणे हेही एक लक्षण आहे. पाणी उकळून शुद्ध करून प्यावे व स्वच्छ, ताजे अन्न खावे. 

श्वसनविकार : या आजारात संसर्गजन्य श्वसन विकार दिसून येतात. हात व शरीर स्वच्छ ठेवण्याबाबत काळजी घ्यावी. श्वसनासंदर्भात कोणताही आजार दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत.डेंग्यू : ताप, डोकेदुखी यासारखी लक्षणे या आजारात दिसून येतात. पुरानंतरच्या पाण्याचा स्पर्श होऊ न देणे व शरीर स्वच्छ ठेवणे. त्याचबरोबर आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत. 

महापुराने निम्मा सांगली जिल्हा ग्रस्त आहे. सध्या पूर ओसरत असताना आजारापासून बचावाची मोठी जबाबदारी सर्वांवर आहे. आरोग्य यंत्रणा काम करीत असतानाच नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घ्यावी. पाणी उकळून पिणे, स्वच्छ अन्न खाणे, बाहेर फिरताना मास्कचा वापर करणे या पद्धतीने आरोग्याची पूर्ण काळजी नागरिकांनी घ्यावी.- डॉ. अनिल मडके, श्वसनविकार तज्ज्ञ, सांगलीसांगलीत महापुरानंतर रस्त्याकडेला कचºयाचे ढीग साचले असून नागरिकही घरांची स्वच्छता करत असताना तेथे कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरMuncipal Corporationनगर पालिकाdocterडॉक्टर