शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरु-भगत की कोठी एक्स्प्रेसला सांगली, कराडमध्ये थांबा नाकारला

By अविनाश कोळी | Updated: May 25, 2024 17:01 IST

प्रवासी संघटनांकडून संताप : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे तक्रार

सांगली : बंगळुरू-भगत की कोठी या उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला एकूण प्रवासात ३७ थांबे मंजूर केले असताना सांगली व कऱ्हाड या उच्च उत्पन्नाच्या स्थानकावर थांबा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडे याप्रकरणी संघटनांनी तक्रार केली आहे.पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीने याबाबत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बंगळुरू-भगत की कोठी एक्स्प्रेस (क्र. ०६५८७/०६५८८) या वातानुकूलित गाडीला सांगली व कऱ्हाडचा थांबा नाकारण्यात आला आहे. या गाडीच्या मार्गावरील ३७ स्थानकांवर थांबा मंजूर आहे, मात्र पुणे विभागातील सांगली आणि कऱ्हाड या जास्त उत्पन्न देणाऱ्या दोन स्थानकांवर थांबा दिला गेला नाही.सांगली आणि कऱ्हाडच्या तुलनेत कमी उत्पन्नाच्या २५ स्थानकांवर या गाड्या थांबतात. सांगली आणि कऱ्हाडच्या जनतेवर हा अन्याय आहे. राजस्थान एसी ट्रेन क्रमांक १९६६८ साठी सांगली थांब्याचे प्रति फेरी उत्पन्न १ लाख रुपये आहे. राणी चेनम्मा एक्स्प्रेसचे सांगली स्टेशनचे दैनंदिन उत्पन्न १.२ लाख रुपये आहे. सांगली स्थानकातील मुंबई गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न ८० हजार रुपये प्रति फेरी इतके आहे. कराड स्थानकाचे विविध गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न सरासरी सुमारे ५० हजार रुपये आहे. हे उत्पन्न रेल्वेच्या लेखी खूप चांगले आहे. त्यामुळे या गाडीला सांगली व कऱ्हाड स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी केली आहे.

प्रवाशांवर अन्याय का?बंगळुरू-भगत की कोठी या उन्हाळी विशेष वातानुकूलित रेल्वे गाड्यांना मोठे उत्पन्न देणाऱ्या सांगली व कऱ्हाड रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नसल्यामुळे सांगली व कऱ्हाड भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी संघटनांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. सांगलीच्या स्थानकावर वारंवार असा अन्याय का केला जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीKaradकराडrailwayरेल्वे