शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तासगाव - कवठेमहांकाळ : विधानसभा संशयकल्लोळाच्या बोहल्यावर रंगणार रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:25 IST

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यावेळची निवडणूक कलाटणी देणारी ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. सद्यस्थितीत संशयकल्लोळाच्या बोहल्यावरच रणांगण रंगणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देतासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघसंशयकल्लोळाच्या बोहल्यावर रंगणार रणांगण

दत्ता पाटील तासगाव : तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यावेळची निवडणूक कलाटणी देणारी ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. सद्यस्थितीत संशयकल्लोळाच्या बोहल्यावरच रणांगण रंगणार असल्याचे चित्र आहे.गतवेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील विरुध्द भाजपचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यात सामना रंगला होता. पाटील यांनी बाजी मारली होती. त्यानंतर काही महिन्यांतच पाटील यांचे निधन झाले. घोरपडेंना रसद पुरविणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभा न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ती पोटनिवडणूक एकतर्फीच झाली.आताची निवडणूक मतदारसंघाला कलाटणी देणारी ठरणार आहे. येथे वर्षानुवर्षे आर. आर. पाटील यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र त्यांच्या पश्चातील नेतृत्वाची पोकळी, भाजपची सत्ता आणि खासदार पाटील यांचा जनसंपर्क यामुळे भाजपचे वर्चस्व वाढले आहे.ही निवडणूक सुमनतार्इंचा कस पाहणारी, त्याहीपेक्षा पुढील निवडणुकीचे उमेदवार आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा प्लॅटफॉर्म निश्चित करणारी आहे.

राजकीय अपरिहार्यता म्हणूनच यावेळी राष्ट्रवादीकडून सुमनताई उमेदवार असतील. पुढील निवडणुकीत रोहित पाटील हेच उमेदवार असतील. तशी घोषण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच केली आहे.तासगाव तालुक्याचा आमदार असावा, या मानसिकतेतून तालुक्यातून उच्चांकी मताधिक्य मिळेल, अशी राष्ट्रवादीला अपेक्षा आहे. एका गटाला खासदार गटाकडून रसद मिळेल अशी अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना मदत केल्यामुळे वंचित फॅक्टर पथ्यावर पडेल, अशीही अपेक्षा आहे, तर राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेले आर. आर.प्रेमीही मदत करतील, अशीही अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. या अपेक्षा पूर्ण होतील की नाही, याच संशयकल्लोळाच्या बोहल्यावर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली जाणार आहे.भाजपकडून अजितराव घोरपडे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मात्र त्यांच्यासाठी कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार, येथून संशयकल्लोळ सुरु आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. जागा वाटपात ही जागा भाजपकडे जाण्याची शक्यताही कमी आहे. मागील निवडणुकीपासून यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत घोरपडे आणि खासदार पाटील यांच्यात संघर्ष सुरु होता. अगदी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घोरपडे आणि राष्ट्रवादीने एकत्रित येत लढवल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत घोरपडेंनी खासदारांशी जुळवून घेतले.कवठेमहांकाळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार-घोरपडेंची हातमिळवणी, लोकसभा निवडणुकीत घोरपडे-खासदारांची हातमिळवणी, आमदारांच्या काही कार्यकर्त्यांची विशाल पाटलांशी, तर काहींची पडळकरांशी हातमिळवणी, असे अनेक रंग मतदारसंघाने अनुभवले आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगलीAjitrao Ghorpadeअजितराव घोरपडे